मराठी बडबड गीते लीरिक्स मराठीमधे | Marathi Badbad Geete Lyrics in English
तुमच्या आमच्या आठवणीतली ही बडबड गीते (Marathi Badbad Geete) प्रत्येक मराठी घरात आपल्या बालकांसाठी म्हटली किंवा गुणगुणली जातात. अशाच सर्व मराठी बडबड गीतांचा संग्रह तुमच्यासाठी खाली देत आहे.
मराठी बडबड गीते भाग 2 साठी- इथे क्लिक करा
हा बडबड गीतांचा संग्रह (Marathi Badbad Geete) जर आवडला तर आपल्या मित्र परिवरा ला जरूर फॉरवर्ड करा.
अडगुलं मडगुलं | ||
अडगुलं मडगुलं | Adagul Madgul
अडगुलं मडगुलं
सोन्याचं कडगुलं
रुप्याचा वाळा
तान्ह्या बाळा
तीट टिळा
ADagula maDagula
sōn’yāca kaḍagula
rupyaachaa vala
tanhya baLa
teeT Teela
अगडं बगडं | Agadam Bagdam
अगडं बगडं डं चिकी डंग
गोल गोल फुग्याचा लाल लाल रंग
तिरकिट तिरकिट तडम् तडम्
फू फू फुगा फुगला टम्
कडकट् कडकट् कडाड् कट्
फू फू फुगा फुटला फट्
आपडी थापडी | Aapadi thapadi
आपडी थापडी
गुळाची पापडी
धम्मक लाडू, तेल काढू !
तेलंगीचे एकच पान
दोन हाती धरले कान !
चाऊ माऊ चाऊ माऊ !
पितळीतले पाणी पिऊ !
हंडा पाणी गडप !
AapaDee ThapaDee in English
AapaDee ThapaDee
guLaachee PaapaDee
dhammal laDu, tel kaDhu
telangeeche ekach paan
don haatee dharale kaan!
chaau maau chaau maau
pitaLeetale paNi piu
hanDaa paanee gaDap
ऐकलंस का?
चिमणीची चिव चिव
टिटवीची टिव टिव
ऐकलीस का ? ऐकलीस का ?
कावळ्याचं काव काव
मांजराचं म्याॅंव म्याॅंव
ऐकलंस का ? ऐकलंस का ?
कोंबड्याचे कू कू
पुंगीचे पू पू
ऐकलंस का ? ऐकलंस का ?
कुत्र्याचं भो भो
गाढवाचं हाॅं हाॅं
ऐकलंस का ? ऐकलंस का ?
इटुक्क मिटुक्क
इटुक्क मिटुक्क
चिंचेचं बुटुक्क
लाल लाल चिंच
तोंड झालं चुटुक्क
मीठ मसाला
कैरीची फोड
चन्या, मन्या
आंबट गोड
हे ही बघा: – एक छोटा बीज
करंगळी मरंगळी | Karangali marangali
करंगळी मरंगळी
मधलं बोट चाफेकळी
तळहात-मळहात
मनगट-कोपर
खांदा-गळागुटी-हनुवटी
भाताचं बोळकं
वासाचं नळकं
काजळाच्या डब्या
देवाजीचा पाट
देवाजीच्या पाटावर
चिमण्यांचा किलबिलाट
कुटू बाई कुटू
कुटू बाई कुटू
दाणे कुटू
तोंडाला पाणी
लागलं सुटू
किसू बाई किसू
खोबरं किसू
किसता किसता
फुटलं हसू
चिरू बाई चिरू
गाजर चिरू
गाजर पारखी
हसली सरू
कोण, काय म्हणतंय?
चाळणीतलं पीठ
म्हणे, “चाळ मला नीट.”
कोपर्यातली काठी
म्हणे, “लागेन हं पाठी.”
पावसातला वारा
म्हणे, “गारा वेच गारा.”
कढईतली पुरी
म्हणे, “कित्ती मी गोरी.”
आता माझी पाळी,
“हवी लिमलेटची गोळी.”
कोण? कोण?
पहाट झाली – सांगतं कोण ?
कुकुsच कोंबडा – आणखी कोण ?
उठा उठा लवकर – सांगतो कोण ?
विठू विठू पोपट – आणखी कोण ?
ताजं ताजं दूध – देतं कोण ?
गोठ्यातली हम्मा – आणखी कोण ?
चोरुन दुध – पितं कोण ?
म्याॅंव-म्याॅंव माऊताई – आणखी कोण ?
घराची राखण – करतं कोण ?
भू-भू कुत्रा – आणखी कोण ?
बागेतली भाजी – खातं कोण ?
मऊ मऊ ससेभाऊ – आणखी कोण ?
कोणाला काय हवे?
कावळ्याला हवे
मेणाचे घर
बेडकाला हवी
पावसाची सर
चिमणी टिपते तांदळाचा दाणा
उंदीर शोधतो तेलाचा घाणा
कपाटावर ठेवला
लोण्याचा गोळा
मनीमाऊचा
त्यावर डोळा
पोपट मागतो कच्चा पेरू
चॉकलेट साठी रडतो बाळू
खार बाई खार
खार बाई खार, नाजूक नार
शेपूट सुंदर, झुबकेदार
खार बाई खार, भित्री फार
पाऊल वाजताच, झाली पसार
खार बाई खार, चपळ फार
क्षणात होते, नजरे पार
खूप खूप मजा
ढुम् ढुम् ढोलकं
पीं पीं बाजा
आज आहे आमची
खूप खूप मजा
छान छान भावली
भावलीचा नवरा
लगीन लागलं
पसारा आवरा
खेळायला चला
खेळायला चला
टक् टक् घड्याळ
टण् टण् टोला
चला आता चला
खेळायला चला
फु बाई फु
फुगडी फु
झिम् पोरी झिम्
झिम्मा झिम्
लप् लप् लप् – लपंडाव
धाव धाव धाव – धावाधाव
धिंग् धिंग् धिंग् – लंगड
हरले हप् टिंग् टिंग् टिंग्
गाडी कशी धावते
गाडी कशी धावते
भप भप भप
पाऊस कसा पडतो
रप रप रप
घोडा कसा धावतो
टप टप टप
बाबा कसे पळतात
धप धप धप
आई कशी भरवते
गप गप गप
बाळ कसा हसतो
हा हा हा हा हा हा
चांदोबा | Chandoba
चांदोबा लपला
झाडीत …..
आमच्या मामाच्या
वाडीत …..
मामाने दिली
साखरसाय …..
चांदोबाला
फुटले पाय …..
चांदोबा गेला
राईत …..
मामाला नव्हते
माहित …..
जेऊ घाल | Jeu Ghaal in Marathi Badbad Geete
अग, अग, चिमणे
हे धर दाणे
दाणे आहेत
चिमुटभर
सांडू नकोस
वाटेवर
पोळ्या कर
आठ नऊ
भात कर
मऊ मऊ
पिल्लूकल्यांना न्हाऊ घाल
पोटभर जेवू घाल
थेंबा थेंबा थांब थांब
थेंबा थेंबा थांब थांब
दोरी तुझी लांब लांब
आकाशात पोहोचली
तिथे कशी खोचली ?
सर सर सर सर धावतोस
सरीवर सरी गुंफतोस
सरी तुझ्या मोत्यांच्या
रुप्याच्या की सोन्याच्या ?
सरी तुझ्या ओल्या
गंगेत जाऊन न्हाल्या
नंदूचा घोडा चंदूचा वाडा
चकमक अंगण
अंगणात रिंगण
रिंगणात घोडा कोणाचा ? कोणाचा ?
रिंगणात घोडा नंदूचा, नंदूचा
लखलख अंगण
अंगणात रिंगण
रिंगणात वाडा कोणाचा ? कोणाचा ?
रिंगणात वाडा चंदूचा, चंदूचा
नंदूचा घोडा
चंदूचा वाडा
नंदू जातो घोड्यावर, घोड्यावर
चांदोबाच्या वाड्यावर, वाड्यावर
पळा रे पळा
पळा रे पळा
गोलाकार सर्वजण पळा रे पळा
उडा रे उडा
वाऱ्यावर सर्वजण उडा रे उडा
नाचा रे नाचा
थय थय थय थय नाचा रे नाचा
हसा रे हसा
हा, हा, ही, ही, हसा रे हसा
बसा रे बसा
गोलाकार सर्वजण बसा रे बसा
निजा रे निजा
डोळे मिटून शांत निजा रे निजा
पावसा पावसा
पावसा पावसा सरसर ये
पावसा पावसा भरभर ये
सरीमध्ये नाचू दे – ओलेचिंब होऊ दे
होडी माझी बनवू दे – होडी होडी खेळू दे
होडी माझी शिडाची
सुरू सुरू चालायची
होडी माझी बंबाची
दूर देशा निघायची
चला सारे गावाला
या रे सारे हिंडायला
दूर दूर भटकायला
पावसामध्ये नाचायला
बबलगम्
आधी बाबा देता दम
मग आणतात बबलगम्
आधी बाबा देता छडी
मग चॉकलेटची मिळते वडी
आई घेते वाचून धडा
मग देते बटाटेवडा
