Guru Charitra Parayan Paddhati | गुरुचरित्र पारायणाची पद्धत

गुरुचरित्र पारायणाची पद्धत | Guru Charitra Parayan Paddhati in Marathi

श्रीगुरुचरीत्र हा ग्रंथ महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही वाचला तसेच पूजला जातो. श्रीनृसिंह सरस्वती यांचा इसवीसनाच्या १४व्या शतकातील दिव्यत्वाचे व तसेच त्यांच्या अद्भुत चरीत्राचे गुणगान करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्यपरंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५ व्या शतकात लिहीला आहे. यांची पारायण पद्धत Guru Charitra Parayan Paddhati पुढे देत आहे.

श्रीसरस्वती गंगाधर हे श्रीगुरूंच्या परंपरेचा वारसा लाभलेले श्रीगुरुकृपासंपन्न, सिद्धानुभवी लेखक आहेत तसेच चरीत्रासारखा अलौकिक विषयाचे लेखन असा योग जुळून आल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. या ग्रंथाचे वाचन अत्यंत लाभप्रद / शुभफलदायी आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरीत्र-वाचनाची एक विशिष्ट पद्धती आहे. या विशिष्ट पद्धतीनेच गरूरुचरित्राचे वाचन, पारायण व्हावे असे स्वतः गुरुचरीत्र लेखकांचे म्हणणे आहे.

“अतःकरण असता पवित्र । सदाकाळ वाचावे गुरुचरित्र ।”
अतर्बाह्य शुचिर्भूतता राखून ह्या ग्रंथाचे वाचन करावे. वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पपूर्तिसाठी गुरुचरीत्र-सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते, असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुभव आहे. पारायणाच्या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचे काही सामान्य नियम वा संकेत खाली देत आहे.

पारायणाचे नियम खालीलप्रमाणे आहेत. Guru Charitra Parayan Paddhati Rules

  • वाचन नेहमी शांतपणे, एका लयीत, आणि सुस्पष्ट असे करावे. उच्चारांमध्ये उच्चारभ्रष्टता होऊ नये यासाठी आपले चित्त सतत उच्चारातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे.
  • वाचनासाठी नेहमी पूेर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुखच बसावे.
  • वाचनासाठी ठराविक वेळ, ठरलेली दिशा आणि जागा असावी. कुठल्याही कारणास्तव यामध्ये बदल होऊ नये याची काळजी घ्यावी.
  • पारायणाच्या वेळी श्रीदत्तात्रयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेऊन तिच्यात श्रीदत्तात्रायांचे आवाहन करावे.
  • सप्ताहकाळात ब्रह्मचर्याचे पालन करावे. वाचन शुचिर्भूुतपणाने व सोवळ्यानेच करावे. सप्ताहात फक्त हविषान्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूध-भात. (मीठ, तिखट, आंबट, दही, ताक वर्ज्य करावे. साखर खावी. गूळ खाऊ नये. गव्हाची पोळी (चपाती), तूप, साखर खाता येईल.)
  • रात्री देवाच्या सन्निधच चटईवर अथवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचे दृष्टांत मिळतात किंवा संदेश ऐकू येतात. असे कित्येक संध्याकांना जे श्रद्धेने अनुष्ठान करतात त्यांचे अनुभव आहेत.
  • वाचनकाळात इतरांशी बोलू नये किंवा आसनावरून मधूनच उठू नये.
  • सप्ताहाचा प्रारंभ कित्येक जण शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात. कारण शुक्रवार हा श्रीगुरूं च्या निजानंदगमनाचा दिवस आहे.
  • सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी, शक्य तर आठव्या दिवशी, सुपारीतून श्रीदत्तात्रायांचे विसर्जन करावे, आणि नैवेद्य दाखवून, आरती करावी. भोजनास सवाष्ण, ब्राह्मण सांगून सांगता करावी. महानैवाद्यात करताना शक्यतो घेवड्याची भाजी असावी.

हे ही वाचा: –

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.