Diwali laxmi puja 2023 Vidhi in Marathi For miraculous Results | दिवाळी लक्ष्मी पूजन मराठीमध्ये (विधिवत)

Photo of author

दिवाळी लक्ष्मी पूजन मराठीत (विधिवत) (शास्त्रोक्त) | Laxmi Puja in Marathi

हिन्दी में पूजा के लिये यहां क्लिक करें।

Diwali Laxmi Pujan in Marathi
Diwali Laxmi Puja in Marathi

दिवाळीच्या शुभ प्रसंगी, अमावस्येच्या संध्याकाळी किंवा रात्री देवी लक्ष्मी आणि गणेशाची विधिवत पूजा (Laxmi Pujan) केली जाते. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सर्व उपाय करण्यासाठी घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ करावा. घरातील सर्व भंगार सामान किंवा रद्दी काढून टाका. घर छान सजवा. घराबाहेर किंवा अंगणात रोषणाई करून रांगोळी काढा. घरातील वातावरण प्रसन्न व आनंदी ठेवा.

या सर्वांशिवाय तुमची लक्ष्मीमातेची पूजा (Laxmi Puja) विधीवत होणे आवश्यक आहे. दिवाळीच्या संध्याकाळी अथवा रात्री मुहूर्तानुसार लक्ष्मी गणेश आणि सरस्वतीसह कुबेरजींची पूजा करा.

2021 दीवाळी लक्ष्मी पूजन मुहूर्त बघण्यासाठी इथे क्लिक करा.

दिवाळी लक्ष्मी पूजन २०२३ | Deepawali Laxmi Puja 2023

पूजन सामग्री:

एक चौरंग, बसण्यासाठी पाट किंवा आसन, लक्ष्मी, गणेश मूर्ती किंवा लक्ष्मी-गणेश-कुबेर-सरस्वती यांचे चित्र, कलावा, सिंदूर, दोन नारळ, अक्षता, लाल कापड, कापसाची गेज वस्त्रे, फुले, दुर्वा, गुलाब, कमळ इ. लाल फुले, फुलांचे हार, तुळशीची पाने, पस्तीस (३५) सुपारी,

दहा लवंग, ५ बदाम, ५ आक्रोड, ५ रूपयाची पाच नाणी, दहा विडयाची पाने, तूप, दोन कलश, दोन आंब्याचे डहाळे, कमळगट्टे, पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर) गंगाजल, सुक्या नारळाचा तुकडा, गूळ, पाच फळे, बत्ताशे, मिठाई, हळद, कुंकू, अबीर, गुलाल, बुक्का।

अगरबत्ती, अगरबत्ती स्टॅंड, अत्तर, दिवा, कापूस, आरतीचे ताट. पूजेतला शंख, घंटा, आरतीचे ताट. कापूरारती आणि धूपाटणे, कुशा, रक्तचंदन, चंदन, पूजेसाठी तांब्याची पळी, पंचपात्र आणि तांबे/पितळेचे दोन ताम्हण,

पूजेसाठी पाणी, देवाची मूर्ती स्वच्छ करण्यासाठी कापड, हात पुसण्यासाठी कापड. शुभ दागिने – देवी लक्ष्मीसाठी साडी-चोळी अथवा ब्लाऊज पीस, काचेच्या बांगड्या, काजल, मेहंदी, मंगळसूत्र, हळकुंड इ., चांदीची नाणी, सोन्याची नाणी, रुपयाच्या नोटा आणि नाणी, दागिने इ., दोन अखंड दिवे – एक देशी तुपाचा आणि दुसरा तेलाचा.

चला तर मग, लक्ष्मी पूजन (Laxmi Puja) कसे करावे ते जाणून घेऊ, जे सर्वात सोप्या आणि पद्धतशीर विधीवत केल्याने अनंत फल देते.

जागृति मंच Diwali laxmi puja 2023 Vidhi in Marathi For miraculous Results | दिवाळी लक्ष्मी पूजन मराठीमध्ये (विधिवत) लक्ष्मी पूजन मांडणी
(Laxmi Puja रचना)

पूजेची पूर्व तयारी आणि मांडणी: –

पूजा सुरू करण्यापूर्वी तुमच्या माहितीसाठी,एकदा पूजा पद्धत अवश्य वाचा, जेणेकरून तुम्ही विसरलेल्या गोष्टी गोळा करू शकाल.
जो व्यक्ती लक्ष्मीची पूजा करतो, त्याने स्नान करून स्वच्छ किंवा धुतलेले स्वच्छ कपडे परिधान करावे. लक्ष्मीपूजनाच्या वेळी कपाळावर तिलक लावून पूजा सुरू करावी. पूजेसाठी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून शुभ आसनावर बसून पूजा करावि. (कधीही दक्षिणेकडे तोंड करून बसू नका.)
वरील आकृतित दाखवल्या प्रमाणे पूजा (Laxmi Puja) मांडणी करावी. चौरंग धुवून पूजेच्या ठिकाणी ठेवा. त्याभोवती रांगोळी काढा. चौरंगावर लाल किंवा पांढरे वस्त्र घालावे.

कलशात पाणी भरून त्यामध्ये दोन सुपारी, दुर्वा, तुळशीची पाने, दोन लाल फुले, सोन्याचे चांदीचे नाणे, एक रुपयाचे नाणे ठेवा. कलशाभोवती हळद-कुंकवाची बोटे ओढून, कलावा बांधावा. कलशावर आंब्याचे डहाळे ठेवा. हा कलश चौरंगाच्या मध्यभागी ठेवा. एका ताम्हणात तांदूळ भरून या कलशावर ठेवा. तांदळावर कुंकवाने स्वस्तिक बनवा आणि त्यावर गणेश आणि लक्ष्मीच्या मूर्ती ठेवा. गणेशजींच्या उजव्या बाजूला लक्ष्मीला ठेवा.

मूर्ती नसेल तर तांदळावर सुपारी ठेवावी. शेजारी कुबेर, सरस्वती आणि काली मातेची मूर्ती असेल तर तीही ठेवावी. (लक्षात ठेवा जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर सुपारी ठेवावी. कुबेराचे प्रतीक मानून तुम्ही चौरंगावर नोटांचे बंडल ठेवू शकता. लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी मातेची डाव्या बाजूला मूर्ती भगवान विष्णूची पूजा करा.

त्याच ताम्हणाच्या काठावर आठ सुपारीचे वर्तुळ बनवा, ही अष्टसिद्धी आहे. त्याच्या आतल्या बाजूस पुन्हा आठ सुपारी ठेऊन वर्तुळ बनवा, हे अष्टलक्ष्मीचे प्रतीक आहे.

आकृतित दाखवल्या प्रमाणे कलशाच्या समोरिल आपल्या उजव्या बाजूला थोड्या तांदळावर गणेशाची सुपारी ठेवावी. कलशाच्या समोरिल आपल्या डाव्या बाजूला तांदळाचे वर्तुळ करून मध्यभागी सूर्यदेवाची सुपारी ठेवावी. त्याच तांदळाच्या काठावर प्रत्येकी आठ ग्रहांची आठ सुपारी आठ दिशांना ठेवावी, हे नवग्रहाचे प्रतीक आहे. चौरंगाच्या चार कोपऱ्याल्या चार दिवे लावा.

कलशाच्या समोर आपल्या उजव्या बाजूला एक शंख ठेवा त्याची पन्हाळ उत्तर दिशेला असावी. कलशाच्या समोर आपल्या डाव्या बाजूला घंटा ठेवा. चांदीच्या नाण्यांनी भरलेली वाटी ठेवा. आणखी सोन्याचे दागिने दुसऱ्या भांड्यात ठेवा.

तुमच्या व्यवसायाच्या पुस्तकांचे रजिस्टर, पेन, डायरी इत्यादी ठेवा. चौरंगावर मागील बाजूस गणेश-लक्ष्मी-सरस्वतीची तसबीर ठेवा आणि तिला हार घाला.
दो-दो पान चे पाच विडे मांडावेत त्यावर दोन लवंगा, एक सुपारी, एक फळ, एक बदाम, एक आक्रोड, 5 रुपयांचे नाणे ठेवा.

Laxmi Puja सुरू करण्यापूर्वी घरातील देवांना, आई-वडील, वडीलधाऱ्यांना नमस्कार करुन आशीर्वाद घ्या.
आसन घातल्यानंतर चौरंगाच्या समोर लक्ष्मी-गणेश मूर्तीसमोर बसावे. आता इतर चार दिवे तसेच तुपाचा आणि तेलाचा इत्यादि दिवे लावा.

(टीप: पूजा सुरू करण्यापूर्वी पूजास्थळी पूजेचे सर्व साहित्य ठेवावे म्हणजे ऐनवेळी धावपळ होणार नाही.)

पूजा प्रारंभ (Laxmi Puja Starts)

कपाळावर तिलक लावा.
तिलक धारण करण्याचा मन्त्र: –
केशवानन्न्त गोविन्द बाराह पुरुषोत्तम ।
पुण्यं यशस्यमायुष्यं तिलकं मे प्रसीदतु ।।
कान्ति लक्ष्मीं धृतिं सौख्यं सौभाग्यमतुलं बलम् ।
ददातु चन्दनं नित्यं सततं धारयाम्यहम् ।।

(पूजेसाठी पाण्याने भरलेला कलश जवळ ठेवावा. पंचपात्रात पाणी घ्या. पळीने उजव्या तळहातावर पाणी घेऊन खालील मंत्राने ते पाणी तीन वेळा प्यावे.)

आचमन:

पळीने उजव्या तळहातावर पाणी घेऊन खालील प्रत्येक नावाने असे तीन वेळा आचमन करा.
ॐ केशवाय नमः स्वाहा,
ॐ नारायणाय नमः स्वाहा,
ॐ माधवाय नमः स्वाहा ।

(चौथ्या वेळी हातात पाणी घेऊन ताम्हणात सोडावे.)
ॐ गोविन्दाय नमः

हात जोडून पुढचे मंत्र म्हणा-
ॐ विष्णवे नमः। ॐ मधुसूदनाय नमः। ॐ त्रिविक्रमाय नमः। ॐ वामनाय नमः।
ॐ श्रीधाराय नमः। ॐ हृषीकेशाय नमः। ॐ पद्मनाभाय नमः। ॐ दामोदराय नमः।
ॐ संकर्षणाय नमः। ॐ वासुदेवाय नमः। ॐ प्रद्युम्नाय नमः। ॐ आनिरुद्धाय नमः।
ॐ पुरुषोत्तमाय नमः। ॐ अधोक्षजाय नमः। ॐ नारसिंहाय नमः। ॐ अच्युताय नमः।
ॐ जनार्दनाय नमः। ॐ उपेन्द्राय नमः। ॐ हरये नमः। ॐ श्रीकृष्णाय नमः।

पुनः आचमन:  यानंतर पुन्हा एकदा पळीने उजव्या तळहातावर पाणी घेऊन तीन वेळा आचमन करा
ॐ केशवाय नमः स्वाहा,
ॐ नारायणाय नमः स्वाहा,
ॐ माधवाय नमः स्वाहा ।
(चौथ्या वेळी हातात पाणी घेऊन ताम्हणात सोडावे.)
ॐ गोविन्दाय नमः
हात जोडून पुढचे मंत्र म्हणा-
ॐ विष्णवे नमः। ॐ मधुसूदनाय नमः। ॐ त्रिविक्रमाय नमः। ॐ वामनाय नमः।
ॐ श्रीधाराय नमः। ॐ हृषीकेशाय नमः। ॐ पद्मनाभाय नमः। ॐ दामोदराय नमः।
ॐ संकर्षणाय नमः। ॐ वासुदेवाय नमः। ॐ प्रद्युम्नाय नमः। ॐ आनिरुद्धाय नमः।
ॐ पुरुषोत्तमाय नमः। ॐ अधोक्षजाय नमः। ॐ नारसिंहाय नमः। ॐ अच्युताय नमः।
ॐ जनार्दनाय नमः। ॐ उपेन्द्राय नमः। ॐ हरये नमः। ॐ श्रीकृष्णाय नमः।

प्राणायाम:

खालील मंत्र म्हणताना अनुलोम-विलोम प्राणायाम करा.
प्रणावस्य परब्रह्म ऋषिः। परमात्मा देवता। दैवी गायत्री छंद:। प्राणायामे विनियोगः। ॐ भू: ॐ भुवः ॐ स्वः ॐ मह: ॐ जन: ॐ तपः ॐ सत्यम् ॐ तत्सवितुर्वरेण्यं। भर्गो देवस्य धीमहि। धियो योन: प्रचोदयात् । ॐ आपो ज्योती रसोऽमृतं ब्रह्मभूर्भुव स्वरोम ।

देवता वंदन आणि ध्यान:

उजव्या हातात पाणी, फुल, अक्षता घ्या आणि लक्ष्मी, गणेश इत्यादी देवांची पूजा करण्याचा संकल्प करा.-

ॐ श्रीमन्महागणपतये नमः। श्री गुरुभ्यो नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री वेदाय नमः। वेदपुरुषाय नमः। इष्टदेवताभ्यो नमः। कुलदेवताभ्यो नमः। स्थान देवताभ्यो नमः। वास्तु देवताभ्यो नमः।

लक्ष्मीनारायणाभ्यां नमः। शचीपुरन्दराभ्यां नमः।
उमामहेश्वराभ्यां नमः। आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः।
मातापितृभ्यां नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमः। सर्वेभ्यो ब्रह्मणेभ्यो नमः॥
अविघ्नमस्तु ॥

सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः।
लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो विनायकः॥
धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः।
द्वादशैतानि नामानि यः पठेच्छृणुयादपि॥

विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा। संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते।।
शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजम् ।प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये ।।

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते।।
सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाममङ्गलम् | येषां हृदिस्थो भगवान् मङ्गलायतनो हरिः ||

तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव । विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेंघ्रियुगं स्मरामि।।
लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः । येषामिन्दीवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः ।।

विनायकं गुरुं भानुं, ब्रह्मविष्णुमहेश्वरान्। सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकामार्थसिद्धये ।।
अभीप्सितार्थसिध्यर्थ पूजितो यः सुरासुरैः । सर्व विघ्नछिदेतस्मै गणाधिपतये नमः।।
सर्वेष्वारबद्धकार्येशु त्रयस्त्रिभुवनेश्वरा:। देवाः दिशंतु नः सिद्धीं ब्रहमेशानजनार्दना:।।

(टीप:- खाली *अमुक असे लिहिलेले आहे तिथे दैनिक पंचाग पाहून संवत्सर नाम, वार, दिवस नक्षत्र, योग, करण, चंद्रराशी, सूर्यराशी आणि गुरुराशी यांचे उच्चार करा. माहित नसेल तर ‘विष्णुयोगे विष्णु कर्णे’ एवढेच म्हटले तरी चालते.)

संकल्प:

ॐ विष्णुर्विष्णुर्विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य श्री ब्रह्मणोऽह्नि द्वितीयेपरार्धे श्री श्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलि-युगे कलि प्रथम चरणे जम्बूद्वीपे भरतखंडे भरतवर्षे आर्य्यावर्तेक देशांतर्गत (*अमुक) क्षैत्रे/नगरे शोभन नाम शक संवत्सरे, नल नाम विक्रम संवत्सरे, (आनंद नाम गुजराती संवत्सरे) दक्षिणायने शरद ऋतौ

महामांगल्यप्रद मासोत्तमे अश्विन मासे कृष्ण पक्षे अमावस्या तिथौ रवी वासरे हस्तपरं विशाखा नक्षत्रे सौभाग्य योगे चतुष्पाद करणे कन्यापरं तुला राशि स्थिते चंद्रे तुला राशि स्थिते सूर्ये शैषेषु गृहेषु यथा यथा राशि स्थितेषु सत्सु एवं गृह गुण गण विशेषण विशिष्ठायां शुभ पुण्यतिथौ

(*अमुक) गौत्रः (*अमुक नाम शर्मा/ वर्मा/ गुप्तो) दासोऽहम्‌ अहं, मम आत्मनः श्रुतिस्मृतिपुराणोक्त फलप्रापत्यर्थ अस्माकं सकुटुंबानाम् सपरिवाराणाम् प्रचलित व्यापारे क्षेम स्थैर्य आयुरारोग्यैश्वर्याधभिवृद्धयर्थम्‌ व्यापारे उत्तरोत्तरलाभार्थम्‌ च यथाज्ञानेन यथा मिलितोपचार-द्रव्यै ध्यानावाहनादि षोडशोपचारपूजनमहं करिष्ये।

उजव्या हातातील पाणी, फुले, अक्षता ताम्हणात सोडा. पुन्हा उजव्या हातात पाणी आणि अक्षता घेऊन खालील मंत्रांचा उच्चार करा.

तत्रादौ दीपावली- महोत्सवे गणपती-श्रीमहालक्ष्मी, महासरस्वती- महाकाली-श्रीविष्णु-नवग्रह-लेखनी- मषीपात्र-कुबेरादि देवानाम्‌ पूजनम्‌ च करिष्ये ।

हातातील पाणी आणि अक्षता ताम्हणात सोडा.

गणपति स्मरण:

खालील मंत्राचा जप करताना पूजा निर्विघ्न होण्यासाठी प्रार्थना करा.
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
कार्यं में सिद्धिमायातु प्रसन्ने त्वयि धातरि।
विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि सुरनायक।।
ॐ भूर्भुव: स्वः। श्री मन्महागणाधिपतये नमः प्रार्थनां समर्पयामि।

चौरंगावरील तुमच्या उजवीकडील तांदळावर जी गणपतीची सुपारी / किंवा मूर्ती आहे ती पाण्याने धुवा, कपड्याने पुसून पुन्हा तांदळावर ठेवा.
गंधम् : ॐ भूर्भुव: स्वः। श्री मन्महागणाधिपतये नमः। गंधम् समर्पयामि। (सुपारीवर फूलाने से गंध शिंपडा)
पुष्पम् : ॐ भूर्भुव: स्वः। श्री मन्महागणाधिपतये नमः। पुष्पम् समर्पयामि। (पुष्प अर्पण करा)
धूपम् : ॐ भूर्भुव: स्वः। श्री मन्महागणाधिपतये नमः। धूपम् आघ्रापयामि। (घंटी वाजवत धूप आघ्रापित करा)
दीपम् : ॐ भूर्भुव: स्वः। श्री मन्महागणाधिपतये नमः। दीपम् दर्शयामि। (घंटी वाजवत दीप दाखवा)

नैवेद्यम् : ॐ भूर्भुव: स्वः। श्री मन्महागणाधिपतये नमः। गुडखाद्य/ दुग्धशर्करा नैवेद्यम् समर्पयामि। (गुळ-खोब-याचा किंवा दूध-साखर नैवेद्य दाखवावा)
नैवेद्य अर्पण करताना पुढील मंत्र म्हणा
ॐ प्राणाय स्वाहा। ॐ अपानाय स्वाहा। ॐ व्यानाय स्वाहा। ॐ उदानाय स्वाहा। ॐ ब्रह्मणे स्वाहा। आता नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि। म्हणत, पळीने एकदा ताम्हणात पाणी सोडा.

परत एकदा ॐ प्राणाय स्वाहा। ॐ अपानाय स्वाहा। ॐ व्यानाय स्वाहा। ॐ उदानाय स्वाहा। ॐ ब्रह्मणे स्वाहा। पुढील तीन मंत्र म्हणत, पळीने ताम्हणात तीनदा पाणी सोडावे.
उत्तरापोशनं समर्पयामि। (एकदा ताम्हणात पाणी सोडा.)
मुखप्रक्षालनं समर्पयामि। (एकदा ताम्हणात पाणी सोडा.)
हस्तप्रक्षालनं समर्पयामि। (एकदा ताम्हणात पाणी सोडा.)

ताम्बूलम् : ॐ भूर्भुव: स्वः। श्री मन्महागणाधिपतये नमः। ताम्बूलम् समर्पयामि। (ताम्बूल अर्पण करा, चौरंगावर ठेवलेल्या डावीकडील पहिल्या विडयावर पाणी सोडा.)
दक्षिणाम् : ॐ भूर्भुव: स्वः। श्री मन्महागणाधिपतये नमः। दक्षिणाम् समर्पयामि। (दक्षिणा अर्पण करा, पहिल्या विडयावर परत पाणी सोडा.)

फलम् : ॐ भूर्भुव: स्वः। श्री मन्महागणाधिपतये नमः। फलम् समर्पयामि। (फळ अर्पण करा, पहिल्या विडयावर ठेवलेल्या फळावर पाणी सोडा)
प्रार्थनाम् : अनेन कृतपूजनेन श्री मन्महागणाधिपति: प्रीयन्ताम्। (डाव्या हातात पळी धरून उजव्या हातावरून ताम्हणात एकदा पाणी सोडा.)शंख पूजनम्:

चौरंगावर पर ठेवलेला शंख स्वच्छ धुवून पुसावा परत चौरंगावर त्याच्या जागी ठेवावा.
ॐ पांचजन्याय विद्महे पवमानाय धीमहि। तन्नः शंख: प्रचोदयात्। ॐ शंख देवतायै नमः। गंधपुष्पं समर्पयामि।(चंदना गंध आणि पांढरी फुले अर्पण करा) (अक्षता वाहू नका)

घंटा पूजनम्:
चौरंगावर ठेवलेली घंटा स्वच्छ धुवून पुसावी परत चौरंगावर त्याच्या जागी ठेवावी.
आगमनार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसाम्।
कुर्वे घंटारवं तत्र देवताव्हानलक्षणम्।। ॐ घंटायै नमः। गंधाक्षतपुष्पं समर्पयामि।
 (गंध, अक्षता, पुष्प अर्पण करा)

उजव्या हाताने एकदा घंटा वाजवून जागेवर ठेवा. हळद कुंकू अक्षता अर्पण करा.
हरिद्राकुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि।

दीप पूजनम्:
पूजा संपेपर्यंत आणि देवतेचा असे पर्यंत दिवा अखंड तेवत राहावा, अशी मनापासून प्रार्थना करा.
तुप आणि तेल याचे अखंड दिवे जे लावले आहेत त्याची गंध, अक्षता, फुले हळद कुंकू अर्पण करून पूजा करा. खालील मंत्राचा उच्चार करून प्रार्थना करा.
भो दीप ब्रह्मरुपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्य:।
आरोग्य देहि पुत्रांश्च सर्वान् कामान् प्रयच्छ मे॥

(पूजा करून नमस्कार करा)

कलश पूजनम्:
लक्ष्मी पूजा (Laxmi Puja) करताना पाण्याचा वापर करण्यासाठी, आपण आपल्याजवळ ठेवलेल्या पाण्याने भरलेल्या कलशाची पूजा करा. त्यात गंध, अक्षत, फुले ठेवून उजव्या तळहाताने झाकून त्यावर आपला डावा हात ठेवून खालील मंत्र म्हणा.

कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रिता:।
मूलेतस्य स्थितो ब्रह्मा मध्ये मात्र गणा स्मृता:।
कुक्षौतु सागरा सर्वे सप्तद्विपा वसुंधरा।
ऋग्वेदोऽथ यजुर्वेद: सामवेदो ह्यथर्वणा:।
अंङेश्च सहिता: सर्वे कलशं तु समाश्रिता:।
अत्र गायत्री सावित्री शांति पुष्टिकरी तथा।
आयान्तु देवपुजार्थं दुरितक्षयकारका:।
गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति ।
नर्मदे सिंधु कावेरि जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु॥
ॐ वरुणाय नमः। ॐ कलशदेवतायै नमः। सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि। नमस्करोमि ।
 

(या कलशाची गंध, अक्षता, फुले हळद-कुंकू अर्पण करून पूजा करा) या कलशातील थोडे पाणी चौरंगावर ठेवलेल्या कलशात घाला) (पूजा केलेल्या कलशाचे पाणी पूजा संपेपर्यंत वापरावे.)

शुद्धीकरण :डाव्या हातात पाणी घेऊन, उजव्या हातात एक फूल घेऊन, त्या फुलातून खालील मंत्राचा उच्चार करून, स्वतःवर आणि पूजा साहित्यावर पाणी शिंपडावे-
ॐ अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा ।
यः स्मरेत्‌ पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यंतरः शुचिः ॥

आसन शुद्धी:
खालील मंत्राने आपल्या आसनावर पाणी शिंपडा-
ॐ पृथ्वी त्वया घता लोका देवि त्वं विष्णुना घृता ।
त्वं च धारय मां देवि पवित्रं कुरु च आसनम्‌ ॥
कलशस्थापना:

चौरंगावर ठेवलेल्या पूजा कलशला हाताने स्पर्श करून खालील मंत्र म्हणा
ॐ आकलशेषु धावति पवित्रे परिषिच्यते। उक्थैर्यज्ञेषु वर्धते।
देवासुरैर्मथ्यमानादुत्पन्नोऽसि महोदधे:।
कुंभ त्वयि सुरा: सर्वे तीर्थानि जलदा नदा:।
तिष्ठन्ति शांतिसुखदा: रुद्रादित्यादयोऽपि च।
अतोऽत्र धान्यराश्यौ त्वां पूजार्थं स्थापयाम्यहम्।
ॐ कलशदेवतायै नमः स्थापयामि । पूजयामि । नमस्करोमि।

(कलशाला गंध, अक्षता, फुले हळद-कुंकू अर्पण करून नमस्कार करा)

नवग्रहादि देवता आवाहनम् पूजनम्:

  • आता नवग्रहांच्या सुपारीवर अक्षता अर्पण करावे.
  • ॐ सूर्याय नमः। सूर्यम् आवाहयामि। नमस्कारोमि। (मध्यभागी असलेल्या सुपारीवर अक्षता अर्पण करा. नमस्कार करा.)
  • ॐ सोमाय नमः। सोमम् आवाहयामि। नमस्कारोमि। (अग्नेय दिशा)
  • ॐ भौमा नमः। भौमम् आवाहयामि। नमस्कारोमि। (दक्षिण दिशा )
  • ॐ बुधाय नमः। बुधम् आवाहयामि। नमस्कारोमि। (ईशान्य दिशा )
  • ॐ बृहस्पतये नमः। बृहस्पतिम् आवाहयामि। नमस्कारोमि। (उत्तर दिशा)
  • ॐ शुक्राय नमः। शुक्रम् आवाहयामि। नमस्कारोमि। (पूर्व दिशा)
  • ॐ शनैश्चराय नमः। शनैश्चरम् आवाहयामि। नमस्कारोमि। (पश्चिम दिशा)
  • ॐ राहवे नमः। राहुम् आवाहयामि। नमस्कारोमि। (नैऋत्य दिशा)
  • ॐ केतवे नमः। केतुम् आवाहयामि। नमस्कारोमि। (वायव्य दिशा)

नवग्रह पूजनम्:

आता सर्व नवग्रहांची पंचोपचार पूजा करावी.
गंधम् : ॐ श्री आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः। गंधम् समर्पयामि। (नऊ सुपारींवर फुलाने गंध शिंपडा)
पुष्पम् : ॐ श्री आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः। पुष्पम् समर्पयामि। (पुष्प अर्पण करा)
धूपम् : ॐ श्री आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः। धूपम् आघ्रापयामि। (घंटी वाजवत धूप आघ्रापित करा)
दीपम् : ॐ श्री आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः। दीपम् दर्शयामि। (घंटी वाजवत दीप दाखवा)
नैवेद्यम् : ॐ श्री आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः। दुग्ध-शर्करा नैवेद्यम् समर्पयामि। (दूध-साखरेचा नैवेद्य दाखवावा)
नैवेद्य अर्पण करताना पुढील मंत्र म्हणा
ॐ प्राणाय स्वाहा। ॐ अपानाय स्वाहा। ॐ व्यानाय स्वाहा। ॐ उदानाय स्वाहा। ॐ ब्रह्मणे स्वाहा।
आता नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि। म्हणत, पळीने एकदा ताम्हणात पाणी सोडा.

परत एकदा म्हणा ॐ प्राणाय स्वाहा। ॐ अपानाय स्वाहा। ॐ व्यानाय स्वाहा। ॐ उदानाय स्वाहा। ॐ ब्रह्मणे स्वाहा।
पुढील तीन मंत्र म्हणत, पळीने ताम्हणात तीनदा पाणी सोडावे.
उत्तरापोशनं समर्पयामि। (एकदा ताम्हणात पाणी सोडा.)
मुखप्रक्षालनं समर्पयामि। (एकदा ताम्हणात पाणी सोडा.)
हस्तप्रक्षालनं समर्पयामि। (एकदा ताम्हणात पाणी सोडा.)

ताम्बूलम् : ॐ श्री आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः। ताम्बूलम् समर्पयामि। (ताम्बूल अर्पण करा, चौरंगावर ठेवलेल्या डावीकडील दुसऱ्या विडयावर पाणी सोडा.)
दक्षिणाम् : ॐ श्री आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः। दक्षिणाम् समर्पयामि। (दक्षिणा अर्पण करा, दुसऱ्या विडयावर परत पाणी सोडा.)
फलम् : ॐ श्री आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः। फलम् समर्पयामि। (फळ अर्पण करा, दुसऱ्या विडयावर ठेवलेल्या फळावर पाणी सोडा.)
प्रार्थनाम् : अनेन कृतपूजनेन श्री आदित्यादि नवग्रह देवता: प्रीयन्ताम्। (डाव्या हातात पळी धरून उजव्या हातावरून ताम्हणात एकदा पाणी सोडा.)

॥इति आवाहित नवग्रह देवता पूजा ॥

श्री गणेश लक्ष्मी कुबेरादि देवता पूजनम्:

चौरंगावर कलशावर गणेश लक्ष्मी विष्णु सरस्वती, महाकाली कुबेर यांच्या मूर्ती किंवा सुपारी ठेवल्या आहेत त्यांची पुजा करा.
हाथ जोडून प्रार्थनापूर्वक ध्यान करा.

ध्यानम्:
ॐ भूर्भुव: स्वः। ॐ श्री महागणपति महालक्ष्मी महाकाली महासरस्वति महाविष्णु कुबेर नवग्रहादि देवताभ्यो नमः। 

ध्यायामि।
गजाननं भूतगणाधिसेवितं, कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् ।
उमासुतं शोकविनाशकारकम्, नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् ॥
नमस्ये सर्वलोकानां जननीमब्जसम्भवाम् ।
श्रियमुन्निद्रपद्माक्षीं विष्णुवक्षःस्थलस्थिताम् ॥
या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रव्रिता |
या वीणा वरा दंडमंडित करा या श्वेत पद्मासना ||
या ब्रह्मच्युत शंकरा प्रभुतिभी देवी सदा वन्दिता |
सामा पातु सरस्वती भगवती निशेश्य जाड्या पहा ||
ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तु‍ते।
नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः ।
नमः प्रकृत्यै भद्रायै प्रणताः स्मताम्‌ ॥
सशंख चक्रं सकिरीटकुण्डलं, सपीत वस्त्रं सर्सिरुहेक्षनं ।
सहार वक्षस्थलकौस्तुभश्रियं, नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजं ।।
शान्ताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं
विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्ण शुभांगम् ।
लक्ष्मीकांत कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं
वन्दे विष्णु भवभयहरं सर्व लौकेक नाथम् ॥
ॐ यक्षराजाय विद्महे। वैश्रवणाय धीमहि तन्नो कुबेरः प्रचोदयात॥

ॐ भूर्भुव: स्वः। श्री गणेश लक्ष्मी कुबेरादि देवताभ्यो नमः। ध्यानं समर्पयामि ।
(कलशावर ठेवलेल्या गणेश लक्ष्मी विष्णु सरस्वती, महाकाली कुबेर यांच्या मूर्ती किंवा सुपारी ठेवल्या आहेत त्यांचे आवाहन करा. वंदन आवाहन)

ॐ भूर्भुव: स्वः। श्री गणेश लक्ष्मी कुबेरादि देवताभ्यो नमः। स्थापयामि पूजयामि । (श्री गणेश-लक्ष्मी इत्यादि सर्व मूर्तीं व सुपारीवर अक्षता अर्पण करा)

ॐ भूर्भुव: स्वः। श्री गणेश लक्ष्मी कुबेरादि देवताभ्यो नमः। आसनार्थे अक्षतां समर्पयामि। (अक्षता अर्पण करा)

कलशावर ताम्हणात ठेवलेल्या गणेश, लक्ष्मी, सरस्वती, कुबेर आणि विष्णु चे ध्यान करा. हातात अक्षता घेऊन पुढील नांवे उच्चारून त्या देवाच्या मूर्तीला किंवा सुपारीला अक्षता अर्पण करा.

ॐ महागणपतये नमः। महागणपतिम् आवाहयामि। (गणेश मूर्ती वर अक्षता अर्पण करा.)
ॐ महाविष्णवे नमः। महाविष्णुम् आवाहयामि। (विष्णु मूर्ती वर अक्षता अर्पण करा.)
ॐ महालक्ष्मै नमः। महालक्ष्मीम् आवाहयामि। (लक्ष्मी मूर्ती वर अक्षता अर्पण करा.)
ॐ महासरस्वत्यै नमः। महासरस्वतिम् आवाहयामि। (सरस्वति मूर्ती वर अक्षता अर्पण करा.)
ॐ महाकाल्यै नमः। महाकालीम् आवाहयामि। (महाकाली मूर्ती वर अक्षता अर्पण करा.)
ॐ कुबेराय नमः। कुबेर आवाहयामि। (कुबेर मूर्ती वर अक्षता अर्पण करा.)

या देवतांना आवाहन केल्यानंतर नमस्कार करावा.

आता कलशावर लक्ष्मीची मूर्ती ठेवलेल्या ताम्हणात कमळाचे फूल ठेवून खालील मंत्र म्हणा.

ॐ श्रीलक्ष्मी समागच्छ पद्मनाभ पदादिह।
षोडशोपचार पूजेयं त्वदर्थ देवि संभूता।।
नमोऽस्तु देव्यै भृगुनन्दनायै नमोऽस्तु विष्णोरुरसि स्थितायै ।
नमोऽस्तु लक्ष्म्यै कमलालयायै नमोऽस्तु दामोदरवल्लभायै ॥
नमः सर्व स्वरुपै च नः कल्याणदायिके।
महासम्पत्प्रदे देवि धनदात्रे नमोऽस्तु ते।।
ब्रह्मरुपे सदानन्दे सदानंद स्वरूपिणी।
द्रुतसिद्धिप्रदे देवि धनदात्रे नमोऽस्तु।।
पद्मासनस्थिते देवि परब्रह्मस्वरूपिणि ।
परमेशि जगन्मातर्महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥
आलयस्ते हि कथित: कमलं कमलालये।
कमले कमले ह्यस्मिन् स्थितिं कृपया कुरु ॥

षोडशोपचार पूजा: (Laxmi Puja with 16 Upachaar)

ॐ भूर्भुव: स्वः। श्री गणेश लक्ष्मी कुबेरादि देवताभ्यो नमः। स्थापयामि पूजयामि । (श्री गणेश-लक्ष्मी व इतर मूर्तीं व सुपारीवर अक्षता अर्पण करावी.)

प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी पुढील मंत्र उच्चार करून गणेश-लक्ष्मी आणि इतर मूर्तींवर पुन्हा अक्षता अर्पण करा.-
अस्यै प्राणाः प्रतिष्ठन्तु अस्यै प्राणाः क्षरन्तु च ।
अस्यै देवत्वमर्चायै मामहेति च कश्चन ॥ प्राणशक्त्यै नमः ।
गणेश लक्ष्मी कुबेरादि देवता! सुप्रतिष्ठिते वरदे भवेताम्‌ । सुप्रतिष्ठितमस्तु।
 (असे म्हणत देवतांची प्राणप्रतिष्ठापना होते.)

आता कलशावर ताम्हणात ठेवलेल्या सर्व देवतांच्या मूर्ती आणि सुपारी दुसऱ्या स्वच्छ ताम्हणात ठेवा.
खालील मंत्राचा जप करताना त्यांना अक्षत अर्पण करा.
ॐ भूर्भुव: स्वः। श्री गणेश लक्ष्मी कुबेरादि देवताभ्यो नमः। प्रतिष्ठापूर्वकम्‌ आसनार्थे । अक्षतान्‌ समर्पयामि।
(प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आसनासाठी अक्षता अर्पण करा)

पाद्यं: – मूर्तींवर पळीने पाणी वहावे किंवा दुर्वा किंवा फुलाने शिंपडावे.
पाद्यं गृहाण देवेश सर्वक्षेमसमर्थ भो। भक्त्या समर्पितं देव लोकनाथ नमोऽस्तु ते॥
ॐ भूर्भुव: स्वः। श्री गणेश लक्ष्मी कुबेरादि देवताभ्यो नमः । पाद्यं समर्पयामि।

अर्घ्यं: – मूर्तींवर पळीने गंध-अक्षत-रुपयाचे नाणे मिश्रित पाणी वहावे किंवा दुर्वा किंवा फुलाने शिंपडावे.
नमस्ते देवदेवेश नमस्ते धरणीधर। नमस्ते जगदाधार अर्घ्यं नः प्रतिगृह्यताम्॥
ॐ भूर्भुव: स्वः। श्री गणेश लक्ष्मी कुबेरादि देवताभ्यो नमः । अर्घ्यं समर्पयामि।

आचमनीयं: – मूर्तींवर पळीने पाणी वहावे किंवा दुर्वा किंवा फुलाने शिंपडावे.
कर्पूरवासितं तोयं मंदाकिन्या: समाहृतम् । आचम्यतां जगन्नाथ मया दत्तं हि भक्तित:॥
ॐ भूर्भुव: स्वः। श्री गणेश लक्ष्मी कुबेरादि देवताभ्यो नमः । आचमनीयं समर्पयामि।

स्नानं: – मूर्तींवर स्नानासाठी पळीने पाणी वहावे किंवा दुर्वा किंवा फुलाने शिंपडावे.
गंगा सरस्वती रेवा पयोष्णी नर्मदाजलैः। स्नापितोअसी मया देव तथा शांति कुरुष्व मे ॥
ॐ भूर्भुव: स्वः। श्री गणेश लक्ष्मी कुबेरादि देवताभ्यो नमः । स्नानं समर्पयामि।

पंचामृत स्नानम्: – मूर्तींवर पळीने दूध, दही, मध, साखर आणि तूप इत्यादींचे मिश्रण किंवा सर्व वेगळे-वेगळे वहावे, त्यावेळी पुढील मंत्र म्हणावे .
पंचामृतं मयानीतं पयो दधि घृतं मधु ।
शर्करया समायुक्तं स्नानार्थ प्रतिगृह्यताम्‌ ॥
ॐ भूर्भुव: स्वः। श्री गणेश लक्ष्मी कुबेरादि देवताभ्यो नमः । पंचामृत स्नानम् समर्पयामि।

आता मूर्ती आणि सुपारी स्वच्छ पाण्याने नीट धुवा.
ॐ भूर्भुव: स्वः। श्री गणेश लक्ष्मी कुबेरादि देवताभ्यो नमः । पंचामृत स्नानांतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि।

परत मूर्तींवर पळीने पाणी वहावे, आणि म्हणावे…
ॐ भूर्भुव: स्वः। श्री गणेश लक्ष्मी कुबेरादि देवताभ्यो नमः । आचमनीयं समर्पयामि।

तैलाभ्यंग स्नानं: – मूर्तींवर फूलाने सुगंधी तेल, अत्तर लावावे.
ॐ भूर्भुव: स्वः। श्री गणेश लक्ष्मी कुबेरादि देवताभ्यो नमः । तैलाभ्यंगस्नानं समर्पयामि।

उन्मर्दनम् गंधोंदकस्नानं: – मूर्तींवर सुगंधी द्रव्य, गंध, हळद, कुंकू मिश्रित पाणी वहावे.
ॐ गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम्।ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियम्॥
कर्पूरैला समायुक्तं सुगंधिद्रव्यसंयुतं। गंधोदकं मया दत्तं स्नानार्थ प्रतिगृह्यतां॥
ॐ भूर्भुव: स्वः। श्री गणेश लक्ष्मी कुबेरादि देवताभ्यो नमः । उन्मर्दनम् गंधोंदकस्नानं समर्पयामि।

आता मूर्ती आणि सुपारी स्वच्छ पाणी घालावे.
ॐ भूर्भुव: स्वः। श्री गणेश लक्ष्मी कुबेरादि देवताभ्यो नमः। शुद्धोदक स्नानं समर्पयामि।

मांगलिक स्नानं: – थोडे कोमट पाणी घाला.

स्नानार्थं जलमानीतं शीतमुष्णं यथा रुचि । सुगंधितं सर्वनदीतीर्थेभ्यः प्रतिगृह्यतां ॥
ॐ भूर्भुव: स्वः। श्री गणेश लक्ष्मी कुबेरादि देवताभ्यो नमः । मांगलिक स्नानं समर्पयामि।

(मूर्तींना गंध लावा)
ॐ भूर्भुव: स्वः। श्री गणेश लक्ष्मी कुबेरादि देवताभ्यो नमः । गंधम् समर्पयामि।

(कपासाचे वस्त्र सर्व देवांना अर्पण करा)
ॐ भूर्भुव: स्वः। श्री गणेश लक्ष्मी कुबेरादि देवताभ्यो नमः। वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रम् समर्पयामि।

(यज्ञोपवित अर्पण करा, नसेल तर अक्षता अर्पण करा)
ॐ भूर्भुव: स्वः। श्री गणेश लक्ष्मी कुबेरादि देवताभ्यो नमः। यज्ञोपवितम् समर्पयामि।

(लक्ष्मीला लाल फुले आणि गणेशाला दुर्वा, विष्णूला तुळशीची पाने, सर्व देवांना ऋतु कालोद्भव फुले अर्पण करा.)
ॐ भूर्भुव: स्वः। श्री गणेश लक्ष्मी कुबेरादि देवताभ्यो नमः। पुष्पं समर्पयामि।

नाना परिमल द्रव्य: अबीर, गुलाल, हळद, कुंकू इत्यादि अर्पण करा.
अबीरं च गुलालं च हरिद्रादिसमन्वितम्‌ ।
नाना परिमल द्रव्यं गृहाण परमेश्वरः ॥
ॐ भूर्भुवः स्वः । श्री गणेश लक्ष्मी कुबेरादि देवताभ्यो नमः। नानापरिमलद्रव्याणि समर्पयामि ।

वस्त्र एवं उपवस्त्र: – खालील मंत्र म्हणत वस्त्र अर्पण करा.
शीतवातोष्णसंत्राणं लज्जायां रक्षणं परम्‌ ।
देहालंकरणं वस्त्रमतः शांति प्रयच्छ मे ॥
ॐ भूर्भुवः स्वः । श्री गणेश लक्ष्मी कुबेरादि देवताभ्यो नमः। वस्त्रं समर्पयामि ।

(खालील मंत्र म्हणत उपवस्त्र समर्पित करा.)
यस्या भावेन शास्त्रोक्तं कर्म किंचिन सिध्यति ।
उपवस्त्रं प्रयच्छामि सर्वकर्मोपकारकम्‌ ॥
ॐ भूर्भुवः स्वः । श्री गणेश लक्ष्मी कुबेरादि देवताभ्यो नमः। उपवस्त्रं समर्पयामि ।

आचमनासाठी पाणी वहावे.:-
वस्त्र उपवस्त्रान्ते आचमनीयं जलं समर्पयामि ॥

(डाव्या हाताने घंटा वाजवताना उजव्या हाताने धूप किंवा अगरबत्ती दाखवा)
ॐ भूर्भुव: स्वः। श्री गणेश लक्ष्मी कुबेरादि देवताभ्यो नमः । धूपं आघ्रापयामि।

(डाव्या हाताने घंटा वाजवताना उजव्या हाताने दीप दाखवा)
ॐ भूर्भुव: स्वः। श्री गणेश लक्ष्मी कुबेरादि देवताभ्यो नमः । दिपं दर्शयामि।

(कलाकंद, पेढे आणि इतर मिठाईचा नैवेद्य अर्पण करा) (नैवेद्य देताना पात्राखाली पाण्याचे मण्डल करून, नैवेद्य पात्राभोवती उजव्या हाताने किंवा पळीने दोनदा पाणी फिरवावे.)
शर्कराखंडखाद्यानि दधिक्षीरघृतानि च ।आहारं भक्ष्य भोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम्‌ ॥
ॐ भूर्भुवः स्वः श्री गणेश लक्ष्मी कुबेरादि देवताभ्यो नमः। नैवेद्यं निवेदयामि ॥

(नैवेद्य अर्पण करताना पुढील मंत्र म्हणा )
ॐ प्राणाय स्वाहा। ॐ अपानाय स्वाहा। ॐ व्यानाय स्वाहा। ॐ उदानाय स्वाहा। ॐ ब्रह्मणे स्वाहा।
आता नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि। म्हणत, पळीने एकदा ताम्हणात पाणी सोडा.

परत एकदा म्हणा
ॐ प्राणाय स्वाहा। ॐ अपानाय स्वाहा। ॐ व्यानाय स्वाहा। ॐ उदानाय स्वाहा। ॐ ब्रह्मणे स्वाहा।
पुढील तीन मंत्र म्हणत, पळीने ताम्हणात तीनदा पाणी सोडावे.
उत्तरापोशनं समर्पयामि। (एकदा ताम्हणात पाणी सोडा.)
मुखप्रक्षालनं समर्पयामि। (एकदा ताम्हणात पाणी सोडा.)
हस्तप्रक्षालनं समर्पयामि। (एकदा ताम्हणात पाणी सोडा.)

ताम्बूलम् : ॐ भूर्भुव: स्वः। श्री गणेश लक्ष्मी कुबेरादि देवताभ्यो नमः। ताम्बूलम् समर्पयामि। (ताम्बूल अर्पण करा, चौरंगावर ठेवलेल्या डावीकडील तिसऱ्या विडयावर पाणी सोडा.)

दक्षिणाम् : ॐ भूर्भुव: स्वः। श्री गणेश लक्ष्मी कुबेरादि देवताभ्यो नमः। दक्षिणाम् समर्पयामि। (दक्षिणा अर्पण करा, तिसऱ्या विडयावर परत पाणी सोडा.)

फलम् : ॐ भूर्भुव: स्वः। श्री गणेश लक्ष्मी कुबेरादि देवताभ्यो नमः। फलम् समर्पयामि। (फळ अर्पण करा, तिसऱ्या विडयावर ठेवलेल्या फळावर पाणी सोडा.)

प्रार्थनाम् : ॐ भूर्भुव: स्वः। अनेन कृतपूजनेन श्री गणेश लक्ष्मी कुबेरादि देवता: प्रीयन्ताम्। (डाव्या हातात पळी धरून उजव्या हातावरून ताम्हणात एकदा पाणी सोडा.)

पुष्पांजली: ॐ भूर्भुव: स्वः। श्री गणेश लक्ष्मी कुबेरादि देवताभ्यो नमः। पुष्पांजलीं समर्पयामि। (सर्व देवांना ऋतु कालोद्भव फुले अर्पण करा.)

लक्ष्मी पूजन प्रारंभ (Laxmi Puja Begins):

महालक्ष्मी विधिपूर्वक पूजन प्रारंभ, लक्ष्मी मंत्र आणि श्रीसूक्ताच्या ऋचांसह विशेष पूजा.

विशेष टीप:- श्रीसूक्तात लक्ष्मीची कृपा आणि अलक्ष्मीची अकृपेसाठी प्रार्थना आहे. त्यामुळे मंत्राचा जप काळजीपूर्वक करा. तुमच्या सोयीसाठी जिथे अलक्ष्मी हा शब्द उच्चारायचा आहे तिथे आम्ही संधी विग्रह केले आहेत.

ध्यानम्: –
या सा पद्मासनस्था विपुलकटितटी पद्मपत्रायताक्ष
गम्भीरावर्तनाभिस्तनभरनमिता शुभ्रवस्त्रोत्तरीया ।
या लक्ष्मीर्दिव्यरूपैर्मणिगणखचितैः स्नापिता हेमकुम्भैः
सा नित्यं पद्महस्ता मम वसतु गृहे सर्वमांगल्ययुक्ता ॥
ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम्‌। चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आ वह ॥
ॐ श्री महालक्ष्म्यै नमः। ध्यानार्थे पुष्पाणि समर्पयामि।
 (पुष्प अर्पण करा.)

आवाहनम्:
(आवाहनासाठी अक्षता अर्पण करा.)
सर्वलोकस्य जननीं सर्वसौख्यप्रदायिनीम्‌ ।
ॐ तां म आ वह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम्‌ ॥
ॐ श्री महालक्ष्म्यै नमः। महालक्ष्मीम् आवाहयामि। आवाहनार्थे अक्षतां समर्पयामि।

आसनम्: (अक्षता अर्पण करें।)
तप्तकांचनवर्णाभं मुक्तामणिविराजितम्‌ ।
अमलं कमलं दिव्यमासनं प्रतिगृह्यताम्‌ ॥
ॐ अश्र्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रमोदिनीम्‌ ।श्रियं देवीमुप ह्वये श्रीर्मा देवी जुषताम्‌ ॥
ॐ श्री महालक्ष्म्यै नमः। आसनार्थे अक्षतां समर्पयामि।

पाद्यम्: (पाद्य अर्पण करा.)
गंगादितीर्थसम्भूतं गन्धपुष्पादिभिर्युतम्‌ ।
पाद्यं ददाम्यहं देवि गृहाणाशु नमोऽस्तु ते ॥
ॐ कां सोस्मितां हिरण्यप्राकारामार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीम्‌।
पद्मेस्थितां पद्मवर्णां तामिहोप ह्वये श्रियम्‌ ॥
ॐ श्री महालक्ष्म्यै नमः। पादयोः पाद्यं समर्पयामि । 
(पळीने पाणी सोडावे.)

अर्घ्यम्: (चन्दन, अक्षत, द्रव्य मिश्रित जल अर्घ्यपात्रातून देवीच्या हातांवर द्यावे.) :

अष्टगन्धसमायुक्तं स्वर्णपात्रप्रपूरितम्‌ ।
अर्घ्यं गृहाणमद्यतं महालक्ष्मी नमोऽस्तु ते ॥
ॐ चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदाराम्‌ ।
तां पद्यनीमीं शरणं प्रपद्ये-अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे ॥
ॐ श्री महालक्ष्म्यै नमः। हस्तयो: अर्घ्यं समर्पयामि ।

आचमन:
सर्वलोकस्य या शक्तिर्ब्रह्मविष्ण्वादिभिः स्तुता ।
ॐ आदित्यवर्णे तपसोऽधि जातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः।
तस्य फलानि तपसा नुदन्तु या अन्तरा याश्च बाह्या-अलक्ष्मीः ॥
ॐ श्री महालक्ष्म्यै नमः। आचमनीयं जलं समर्पयामि।
 (पळीने ताम्हणात पाणी सोडावे.)

स्नानम्:
मन्दाकिन्याः समानीतैर्हेमाम्भोरुहवासितैः ।
स्नानं कुरुष्व देवेशि सलिलैश्च सुगन्धिभिः ॥
ॐ श्री महालक्ष्म्यै नमः। स्नानं समर्पयामि । (स्नानासाठी पळीने ताम्हणात तीनदा पाणी सोडावे.)
स्नानान्तरेण आचमनीयं जलं समर्पयामि । 
(‘ॐ महालक्ष्म्यै नमः‘ म्हणून आचमनासाठी पळीने ताम्हणात तीनदा पाणी सोडावे.)

दुग्ध स्नानम्: (कच्च्या दूधाने स्नान घालावे)
कामधेनुसमुत्पन्नां सर्वेषां जीवनं परम्‌ ।
पावनं यज्ञहेतुश्च पयः स्नानार्थमर्पितम्‌ ॥
ॐ पयः पृथिव्यां पय औषधीषु पयो दिव्यन्तरिक्षे पयो धाः। पयस्वतीः प्रदिशः सन्तु मह्यम्‌ ॥
ॐ श्री महालक्ष्म्यै नमः। पयः स्नानं समर्पयामि ।
पयः स्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि।
 (परत शुद्ध पाण्याने स्नान घालावे)

दधि स्नानम्: (दह्याने स्नान घालावे)
पयसस्तु समुद्भूतं मधुराम्लं शशिप्रभम्‌ ।
दध्यानीतं मया देवि स्नानार्थं प्रतिगृह्यताम्‌ ॥
ॐ दधिक्राव्णो अकारिषं जिष्णोरश्वस्य वाजिनः
सुरभि नो मुखा करत्प्र ण आयू(गुँ)षि तारिषत्‌ ।

ॐ श्री महालक्ष्म्यै नमः। दधिस्नानं समर्पयामि।
दधिस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि।
 (परत शुद्ध पाण्याने स्नान घालावे)

घृत स्नानम्: (शुद्ध तुपाने स्नान घालावे)
नवनीतसमुत्पन्नं सर्वसंतोषकारकम्‌ । घृतं तुभ्यं प्रदास्यामि स्नानार्थं प्रतिगृह्यताम्‌ ॥
ॐ घृतं घृतपावनः पिबत वसां वसापावनः
पिबतान्तरिक्षस्य हविरसि स्वाहा ।
दिशः प्रदिश आदिशो विदिश उद्दिशो दिग्भ्यः स्वाहा ॥
ॐ श्री महालक्ष्म्यै नमः। घृतस्नानं समर्पयामि ।
घृतस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि। 
(परत शुद्ध पाण्याने स्नान घालावे)

मधु स्नानम्: (मधाने स्नान घालावे)
तरुपुष्पसमुद्भूतं सुस्वादु मधुरं मधु ।
तेजः पुष्टिकरं दिव्यं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्‌ ॥
ॐ मधु वाता ऋतायते मधु क्षरन्ति सिन्धवः । माध्वीर्नः सन्त्वोषधीः ॥
मधु नक्तमुतोषसो मधुमत्पार्थिव(गुँ) रजः । मधु द्यौरस्तु नः पिता ॥
मधुमान्ना वनस्पतिर्मधुमाँ(गुँ) अस्तु सूर्यः । माध्वीर्गावो भवंतु नः ॥
ॐ श्री महालक्ष्म्यै नमः। मधुस्नानं समर्पयामि ।
मधुस्नानन्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि। 
(परत शुद्ध पाण्याने स्नान घालावे)

शर्करा स्नानम्: (साखरेने स्नान घालावे)
इक्षुसारसमुद्भूता शर्करा पुष्टिकारिका।
मलापहारिका दिव्या स्नानार्थं प्रतिगृह्यताम्‌ ॥
ॐ अपा(गुं), रसमुद्वयस(गुं) सूर्ये सन्त(गुं) समाहित्‌म ।
अपा(गुं) रसस्य यो रसस्तं वो
गृह्याम्युत्तममुपयामगृहीतो-सीन्द्राय त्वा जुष्टं
गुह्ढाम्येष ते योनिरिन्द्राय त्वा जुष्टतमम्‌ ॥
ॐ श्री महालक्ष्म्यै नमः। शर्करास्नानं समर्पयामि।
शर्करा स्नानान्तरेण पुनः शुद्धोदक स्नानं समर्पयामि।
 (परत शुद्ध पाण्याने स्नान घालावे)

पंचामृत स्नानम्: (दूध, दही, तूप, साखर आणि मध मिसळून पंचामृत तयार करा आणि खालील मंत्राने स्नान करा.)
पयो दधि घृतं चैव मधुशर्करयान्वितम्‌ ।
पंचामृतं मयानीतं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्‌ ॥
ॐ पंच नद्यः सरस्वतीमपि यन्ति सस्त्रोतसः ।
सरवस्ती तु पञ्चधा सो देशेऽभवत्‌-सरित्‌ ॥
ॐ श्री महालक्ष्म्यै नमः। पंचामृतस्नानं समर्पयामि।
पंचामृतस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि।
 (पंचामृत स्नान व परत शुद्ध पाण्याने स्नान घालावे)

गन्धोदक स्नानम्: (चंदन मिश्रित पाण्याने स्नान घालावे)
मलयाचलसम्भूतं चन्दनागरुसम्भवम्‌ ।
चन्दनं देवदेवेशि स्नानार्थं प्रतिगृह्यताम्‌ ॥
ॐ श्री महालक्ष्म्यै नमः। गन्धोदकस्नानं समर्पयामि।

(टीप:- ज्यांना श्री सूक्त, पुरुषसूक्त किंवा लक्ष्मी सहस्रनाम इत्यादींसह पुष्पार्चन किंवा जल अभिषेक करायचा असेल त्यांनी अर्चना किंवा अभिषेक करावा, नंतर शुद्धोदक स्नान घालावे किंवा फक्त शुद्धोदक स्नान घालावे.)

अभिषेक: (ॐ श्रीं नमः हा मंत्र १०८ वेळा म्हणत किंवा श्री सूक्तम् किंवा लक्ष्मी सहस्रनाम म्हणत अभिषेक करावा)

Click here for Laxmi Sahatranam Stotram

लक्ष्मी सहस्रनाम स्तोत्रासाठी इथे क्लिक करें

शुद्धोदक स्नानम्:
मन्दाकिन्यास्तु यद्वारि सर्वपापहरं शुभम्‌ ।
तदिदं कल्पितं तुभ्यं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्‌ ॥
ॐ श्री महालक्ष्म्यै नमः। शुद्धोदकस्नानं समर्पयामि।
 (गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने स्नान घालावे)

आचमन :
नंतर ॐ महालक्ष्म्यै नमः असे म्हणत आचमनासाठी पळीने ताम्हणात पाणी सोडावे.

वस्त्रम्: (वस्त्र अर्पण करावे.)
दिव्याम्बरं नूतनं हि क्षौमं त्वतिमनोहरम्‌ ।
दीयमानं मया देवि गृहाण जगदम्बिके ॥
ॐ उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह।
प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन्‌ कीर्तिमृद्धिं ददातु मे ॥
ॐ श्री महालक्ष्म्यै नमः। वस्त्रं समर्पयामि, आचमनीयं जलं च समर्पयामि ।
 (आचमनासाठी पळीने ताम्हणात पाणी सोडावे.)

उपवस्त्रम्: (उपवस्त्र अर्पण करावे.)
कंचुकीमुपवस्त्रं च नानारत्नैः समन्वितम्‌ ।
गृहाण त्वं मया दत्तं मंगले जगदीश्र्वरि ॥
ॐ श्री महालक्ष्म्यै नमः। उपवस्त्रं समर्पयामि। आचमनीयं जलं च समर्पयामि।
 (आचमनासाठी पळीने ताम्हणात पाणी सोडावे.)

यज्ञोपवीतम्: (यज्ञोपवित अर्पण करा, नसेल तर अक्षता अर्पण करा)
ॐ तस्मादअकूवा अजायंत ये के चोभयादतः।
गावोह यज्ञिरे तस्मात्तस्माज्जाता अजावयः॥
ॐ यज्ञोपवीतं परमं वस्त्रं प्रजापतयेः त्सहजं पुरस्तात॥
आयुष्यम अग्रयं प्रतिमुञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तुतेजः।
ॐ श्री महालक्ष्म्यै नमः। यज्ञोपवीतं समर्पयामि।

आभूषणम्: (आभूषणे अर्पण करा)
रत्नकंकणवैदूर्यमुक्ताहारादिकानि च ।
सुप्रसन्नेन मनसा दत्तानि स्वीकुरुष्व भोः ॥

ॐ क्षुत्विपासामलां ज्येष्ठाम्‌-अलक्ष्मीं नाशयाम्यहम्‌ ।
अभूतमसमृद्धिं च सर्वां निर्णुद मे गृहात्‌ ॥
ॐ श्री महालक्ष्म्यै नमः। नानाविधानि कुंडलकटकादीनि आभूषणानि समर्पयामि ।

गन्धम्: (केसर मिश्रित चन्दन अर्पण करा.)
श्रीखण्डं चन्दनं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरम्‌।
विलेपनं सुरश्रेष्ठे चन्दनं प्रतिगृह्यताम्‌ ॥
ॐ गन्धद्वारां दुराधर्षां नित्युपुष्टां करीषिणीम्‌ ।
ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोप ह्वये श्रियम्‌ ॥ ॐ श्री महालक्ष्म्यै नमः। गन्धं समर्पयामि।

रक्त चन्दनम्:
रक्तचन्दनसम्मिश्रं पारिजातसमुद्भवम्‌।
मया दत्तं महालक्ष्मी चन्दनं प्रतिगृह्यताम ॥ ॐ श्री महालक्ष्म्यै नमः। रक्तचन्दनं समर्पयामि।

(रक्त चंदन अर्पण करा)

सिन्दूरम्: (शेन्दूर अर्पण करा)
सिन्दूरं रक्तवर्णं च सिन्दूरतिलकप्रिये ।
भक्तया दत्तं मया देवि सिन्दूरं प्रतिगृह्यताम्‌ ॥
ॐ सिन्धोरिव प्राध्वने शूघनासो वात प्रमियः पतयन्ति यह्वाः ।
घृतस्य धारा अरुषो न वाजी काष्ठा भिन्दन्नूर्मिभिः पिन्वमानः ॥
ॐ श्री महालक्ष्म्यै नमः। सिन्दूरं समर्पयामि।

कुंकुमम्: (कुंकुम अर्पण करा.)
कुंकुमं कामदं दिव्यं कुंकुमं कामरूपिणम्‌ ।
अखण्डकामसौभाग्यं कुंकुमं प्रतिगृह्यताम्‌ ॥ ॐ श्री महालक्ष्म्यै नमः। कुंकुमं समर्पयामि।

पुष्पसार (अत्तर) : (फूलाने लक्ष्मी ला अत्तर लावावे)
तैलानि च सुगन्धीनि द्रव्याणि विविधानि च ।
मया दत्तानि लेपार्थं गृहाण परमेश्वरि ॥ ॐ श्री महालक्ष्म्यै नमः। पुष्पसारं च समर्पयामि।

अक्षत: (कुंकुम मिश्रित अक्षता अर्पण करा)
अक्षताश्च सुरश्रेष्ठे कुंकुमाक्ताः सुशोभिताः।
मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वरि ॥ ॐ श्री महालक्ष्म्यै नमः। अक्षतान्‌ समर्पयामि।

पुष्पमाला: (लाल कमळ किंवा गुलाबाची फुले आणि हारांनी देवीला अलंकृत करा.)
माल्यादीनि सुगन्धीनि माल्यादीनि वै प्रभो ।
मयानीतानि पुष्पाणि पूजार्थं प्रतिगृह्यताम्‌ ॥
ॐ मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि ।
पशूनां रूपमन्नास्य मयि श्रीः श्रयतां यशः ॥
ॐ श्री महालक्ष्म्यै नमः। पुष्पं पुष्पमालां च समर्पयामि ।

दूर्वा:
विष्ण्वादिसर्वदेवानां प्रियां सर्वसुशोभनाम्‌ ।
क्षीरसागरसम्भूते दूर्वां स्वीकुरू सर्वदा ॥
ॐ श्री महालक्ष्म्यै नमः। दूर्वांकुरान्‌‌ समर्पयामि।
 (दूर्वांकुर अर्पण करा.)

कुंकू मिश्रित अक्षतांसह महालक्ष्मीच्या विविध अंगांची पूजा करा. :-

अंग पूजा:

ॐ चपलायै नमः। पादौ पूजयामि। (पायांवर अक्षता वहाव्यात.)
ॐ चंचलायै नमः। जानुनी पूजयामि। (मांड्यांवर अक्षता वहाव्यात)
ॐ कमलायै नमः। कटिं पूजयामि। (कंबरेवर अक्षता वहाव्यात)
ॐ कात्यायन्यै नमः। नाभिं पूजयामि। (नाभिवर अक्षता वहाव्यात)
ॐ जगन्मात्रे नमः। जठरं पूजयामि। (जठरावर अक्षता वहाव्यात)
ॐ विश्ववल्लभायै नमः। वक्षः स्थलम्‌ पूजयामि। (छातीवर अक्षता वहाव्यात)
ॐ कमलवासिन्यै नमः। हस्तौ पूजयामि। (हातांवर अक्षता वहाव्यात)
ॐ पद्माननायै नमः। मुखं पूजयामि। (मुखावर अक्षता वहाव्यात)
ॐ कमलपत्राक्ष्यै नमः। नेत्रत्रयं पूजयामि। (डोळ्यांवर अक्षता वहाव्यात)
ॐ श्रियै नमः। शिरः पूजयामि। (डोक्यावर अक्षता वहाव्यात)
ॐ श्री महालक्ष्म्यै नमः। सर्वांग पूजयामि। (सर्व अंगावर अक्षता वहाव्यात)

यानंतर ताम्हणात बाहेरील वर्तुळाकार ठेवलेल्या आठ सुपारीवर घड्याळाच्या दिशेने पूर्व, अग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य दिशेला पुढील आठ सिद्धींची पूजा करावी.

अष्टसिद्धिपूजन:

पूर्व दिशेला :- ‘ॐ अणिम्ने नमः’
आग्नेय दिशेला :- ‘ॐ महिम्ने नमः
दक्षिण दिशेला :- ‘ॐ गरिम्ने नमः
नैऋत्य दिशेला :- ‘ॐ लघिम्ने नमः
पश्चिम दिशेला :- ‘ॐ प्राप्त्यै नमः
वायव्य दिशेला :- ‘ॐ प्रकाम्यै नमः
उत्तर दिशेला :- ‘ॐ ईशितायै नमः
ईशान्य दिशेला :- ‘ॐ वशितायै नमःअष्टलक्ष्मी पूजन:

यानंतर अष्टसिद्धीच्या आतील बाजूस वर्तुळाकार ठेवलेल्या सुपारीच्या पूर्व दिशेपासून सुरुवात करून आठ दिशेला घड्याळाच्या काट्याच्या क्रमाने आठ लक्ष्मींची पूजा करावी.
ॐ आदिलक्ष्म्यै नमः।
ॐ धनलक्ष्म्यै नमः।
ॐ धान्यलक्ष्म्यै नमः।
ॐ गजलक्ष्म्यै नमः।
ॐ सन्तानलक्ष्म्यै नमः।
ॐ वीरलक्ष्म्यै नमः।
ॐ विजयलक्ष्म्यै नमः।
ॐ विद्यालक्ष्म्यै नमः।

आचमन: (आचमनासाठी पळीने ताम्हणात पाणी सोडावे.)
शीतलं निर्मलं तोयं कर्पूरण सुवासितम्‌ ।
आचम्यतां जलं ह्येतत्‌ प्रसीद परमेश्वरि ॥
ॐ श्री महालक्ष्म्यै नमः। आचमनीयं जलं समर्पयामि ।

ऋतुफल अर्पण: (ऋतुफल अर्पण करा) (सीताफळ, उस, व अन्य फळे)
फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरम्‌ ।
तस्मात्‌ फलप्रदादेन पूर्णाः सन्तु मनोरथाः ॥
ॐ श्री महालक्ष्म्यै नमः। अखण्डऋतुफलं समर्पयामि।
आचमनीयं जलं च समर्पयामि।
 (आचमनासाठी पळीने ताम्हणात पाणी सोडावे)

ताम्बूलम्: (लवंग, वेलदोड़ा ताम्बूल अर्पण करें।)
पूगीफलं महादिव्यं नागवल्लीदलैर्युतम्‌ ।
एलादिचूर्णसंयुक्तं ताम्बूलं प्रतिगृह्यताम्‌ ॥
ॐ आर्द्रां यः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीम्‌ ।
सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आ वह ॥
ॐ श्री महालक्ष्म्यै नमः। मुखवासार्थे ताम्बूलं समर्पयामि।

(ताम्बूल अर्पण करा, चौरंगावर ठेवलेल्या डावीकडून चौथ्या विडयावर पाणी सोडा.)

महादक्षिणा: (दक्षिणा अर्पण करें)
हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीजं विभावसोः ।
अनन्तपुण्यफलदमतः शान्तिं प्रयच्छ मे ॥
ॐ तां म आ वह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम्‌ ।
यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योऽश्वान्‌ विन्देयं पुरुषानहम्‌ ॥ ॐ श्री महालक्ष्म्यै नमः। दक्षिणां समर्पयामि ।

(ताम्बूल अर्पण करा, चौरंगावर ठेवलेल्या डावीकडून चौथ्या विडयावर पाणी सोडा.)

महानिरांजन:
चक्षुर्दं सर्वलोकानां तिमिरस्य निवारणम्‌ ।
आर्तिक्यं कल्पितं भक्तया गृहाण परमेश्वरि ॥
ॐ श्री महालक्ष्म्यै नमः। नीराजनं समर्पयामि ।
 (निरांजन ओवाळावेत, पळीने निरांजनाच्या भोवतीने पाणी फिरवावे आणि ताम्हणात पाणी सोडावे)

प्रदक्षिणा :
यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च ।
तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणपदे पदे ॥
 (प्रदक्षिणा अर्पण करा.)

प्रार्थना: हाथ जोड़कर बोलें
विशालाक्षी महामाया कौमारी शंखिनी शिवा ।
चक्रिणी जयदात्री चरणमत्ता रणाप्रिया॥
भवानि त्वं महालक्ष्मीः सर्वकामप्रदायिनी ।
सुपूजिता प्रसन्ना स्यान्महालक्ष्मी! नमोऽस्तु ते ॥
नमस्ते साधक प्रचुर आनंद सम्पत्ति सुखदायिनी ।
या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात्‌ त्वदर्चनात्‌ ॥
ॐ श्री महालक्ष्म्यै नमः। प्रार्थनापूर्वकं नमस्कारम्‌ समर्पयामि।
 (प्रार्थनापूर्वक नमस्कार करा.)

समर्पण: (खालील मंत्रांचा उच्चार करत पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन ताम्हणात सोडावे.)
‘कृतेनानेन पूजनेन भगवती महालक्ष्मीदेवी प्रीतताम्‌, न मम’।

Diwali Laxmi Pujan Vidhi in Marathi | दिवाळी लक्ष्मी पूजन मराठी (विधीवत)

(Laxmi Puja at Home)

देहली, दवात, बही-खाता, तिजोरी व दीपावली (दीपमालिका) पूजन:

देहली पूजन: (Main door Puja during Laxmi Puja)
तुमच्या व्यवसाय, कार्यालय आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सिंदूर किंवा कुंकवाने ‘ओम श्री गणेशाय नमः‘ तसेच ‘स्वस्तिक चिन्ह’, ‘शुभ लाभ’ इत्यादी लिहा.
त्यानंतर ॐ देहलीविनायकाय नमः मंत्राचा उच्चार करून गंध, फुले आणि अक्षता वाहून पूजा करावी.

दवात (श्री महाकाली) पूजन: (Ink bottle Puja during Laxmi Puja)
काळ्या शाईने भरलेले दौत भगवती महालक्ष्मीसमोर फुलांवर व अक्षतांवर ठेवावे, शेंदूराने स्वस्तिक बनवावे व नाडा गुंडाळावा.
आता ॐ श्रीमहाकाल्यै नमः म्हणत भगवती महाकालीची गंध, फुले, अक्षता, धूप, दिप आणि नैवेद्य देऊन पूजा करावी.

अशा प्रकारे प्रार्थनापूर्वक नमस्कार करा-
कालिके! त्वं जगन्मातः मसिरूपेण वर्तसे ।
उत्पन्ना त्वं च लोकानां व्यवहारप्रसिद्धये ॥
या कालिका रोगहरा सुवन्द्या भक्तैः समस्तैर्व्यवहराद क्षैः ।
जनैर्जनानां भयहारिणी च सा लोकमाता मम सौख्यदास्तु ॥
 (दौतीला पुष्प अर्पण करत नमस्कार करा)

लेखनी पूजन: (Pen pujan during Laxmi Puja)

लेखनी (पेन ) वर नाड़ा/ कलावा गुंडाळावा आणि देवि समोर ठेवावे.
खालील मंत्र म्हणत पूजा करावी:-
लेखनी निर्मिता पूर्वं ब्रह्मणा परमेष्ठिना ।
लोकानां च हितार्थाय तस्मात्तां पूजयाम्यहम्‌ ॥
‘ॐ लेखनीस्थायै देव्यै नमः
‘ गंध, पुष्प, वाहून पूजन करा.

प्रार्थना करा.
शास्त्राणां व्यवहाराणां विद्यानामाप्नुयाद्यतः।
अतस्त्वां पूजयिष्यामि मम हस्ते स्थिरा भव ॥

बही-खाता ( सरस्वती) पूजन: (Accounts Book Pujan during Laxmi Puja)
बस्त्यावर रोळी किंवा केशर मिश्रित चंदनाने स्वस्तिक चिन्ह बनवावे आणि त्यावर हिशोबाच्या वह्यां ठेवाव्यात। वह्यांच्या पहिल्या पानावर स्वस्तिक बनवावे आणि पाच हळदीच्या गाठी, धणे, कमलगट्टा, ठेवावे. थैलीत अक्षत, दुर्वा आणि द्रव्य ठेऊन सरस्वतीचे ध्यान करावे.

या कुन्देन्दुतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्यासना ॥
या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवेः सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
ध्यान मंत्र म्हणून नमस्कार करावा.
ॐ वीणापुस्तक धारिण्यै श्री सरस्वत्यै नमः।
 या मंत्राने सरस्वतीचे गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य दाखवून पूजन करावे.

तिजोरी (कुबेर) पूजन:
तिजोरीवर स्वस्तिक बनवा आणि खजिनदार कुबेराचे खालील मंत्र म्हणून आवाहन करा. :-
आवाहयामि देव त्वामिहायाहि कृपां कुरु ।
कोशं वर्द्धय नित्यं त्वं परिरक्ष सुरेश्र्वर ॥

आवाहना नंतर ॐ कुबेराय नमः। हा मंत्र म्हणत कुबेराचे गन्ध, अक्षता, धूप, दीप, नैवेद्य दाखवून पूजन करावे.

कुबेराची प्रार्थना करा:-
धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपाय च ।
भगवन्‌ त्वत्प्रसादेन धनधान्यादिसम्पदः ॥

यानंतर कुबेर आणि महालक्ष्मीची पूजा केलेली पिशवी (हळद, धणे, कमलगट्टा, द्राव्य, दूर्वा असलेली) तिजोरीत ठेवून महालक्ष्मीसह कुबेराला नमस्कार करा.

तुला-पूजन: (Waighing scale Pujan during Laxmi Puja)
तुमच्या व्यवसाय, कार्यालय आणि घराच्या ठिकाणी वापरल्या जाणार्‍या तराजूवर (तुला) स्वस्तिक बनवा, त्यावर नाडा गुंडाळा आणि नाडासोबत गुंडाळलेल्या तुलाधिष्ठातृदेवतेचे ध्यान पुढील प्रकारे करा.:-

नमस्ते सर्वदेवानां शक्तित्वे सत्यमाश्रिता ।
साक्षीभूता जगद्धात्री निर्मिता विश्वयोनिना ॥

ध्याना नंतर ॐ तुलाधिष्ठातृदेवतायै नमः। हा मंत्र म्हणत तुलाधिष्ठातृदेवतेचे गन्ध, अक्षता, फूल, धूप, दीप, नैवेद्य दाखवून पूजन करावे.

दीपमालिका (दीपक) पूजन:
एका ताटात अकरा, एकवीस किंवा अधिक किंवा कमी (शक्तीप्रमाणे) दिवे लावून महालक्ष्मीसमोर ठेवून त्या दीपमालिकेची अशा प्रकारे प्रार्थना करावी.
त्वं ज्योतिस्त्वं रविश्चन्द्रो विद्युदग्निश्च तारकाः ।
सर्वेषां ज्योतिषां ज्योतिर्दीपावल्यै नमो नमः ॥

प्रार्थने नंतर ॐ दीपावल्यै नमः। हा मंत्र म्हणत दीप मालेचे गन्ध, अक्षता, फूल, धूप, दीप, नैवेद्य दाखवून पूजन करावे.

यानंतर ऊस, सीताफल शिंगाडा, वर्षाचे धान्य इत्यादि पदार्थ अर्पण करा. वर्षाचे धान्य गणेश, महालक्ष्मी तथा अन्य देवी-देवतांनापण अर्पण करा.

शेवटी या सर्व दिव्यांनी घर किंवा व्यवसायाची जागा, कार्यालय सजवा.

यानंतर दीपक आणि कपूर यांच्यासोबत श्री महालक्ष्मीची महा आरती करा.
(आरती केल्यानंतर, थंड होण्यासाठी पाणी सोडा आणि स्वतः आरती घ्या, पूजेत सहभागी असलेल्या सर्व लोकांना आरती द्या, नंतर आपले हात धुवा.)

गणपती आरती करितां इथे क्लिक करा।

महालक्ष्मी आरती के लिये क्लिक करें।

मंत्र-पुष्पांजलि:
(प्रत्येकाच्या हातात फुले देऊन खालील मंत्र म्हणा)
ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्‌ ।
तेह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ॥
ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।
स मे कामान्‌ कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु॥
कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ।
ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं
महाराज्यमपित्यमयं समन्तपर्यायी स्यात्‌ सार्वभौमः
सार्वायुषान्तादापरार्धात्‌ ।
पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराडिति
तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसन्‌ गृहे ।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ।
ॐ विश्वतश्चक्षुरुत विश्वतोमुखो विश्वतोबाहुरुत विश्वतस्पात्‌ ।
सं बाहुभ्यां धमति सं पतत्रैर्द्यावाभूमी जनयन्‌ देव एकः ॥
ॐ महालक्ष्म्यै च विद्महे, विष्णुपत्न्यै च धीमहि, तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्‌ ।
ॐ या श्रीः स्वयं सुकृतिनां भवनेष्वलक्ष्मीःपापात्मनां कृतधियां हृदयेषु बुद्धिः ।
श्रद्धा सतां कुलजनप्रभवस्य लज्जा
तां त्वां नताः स्म परिपालय देवि विश्वम्‌ ॥
ॐ श्री महालक्ष्म्यै नमः। मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि ।

(महालक्ष्मीला हातातली फुले अर्पण करा.)

प्रदक्षिणा करा. साष्टांग नमस्कार करा., आता हात जोडून खालील क्षमा प्रार्थना म्हणा:-

क्षमा प्रार्थना :
आवाहनं न जानामि न जानामि विसर्जनम्‌ ॥
पूजां चैव न जानामि क्षमस्व परमेश्वरि ॥
मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरि ।
यत्पूजितं मया देवि परिपूर्ण तदस्तु मे ॥
त्वमेव माता च पिता त्वमेव
त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव ।त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव
त्वमेव सर्वम्‌ मम देवदेव ।
पापोऽहं पापकर्माहं पापात्मा पापसम्भवः ।
त्राहि माम्‌ परमेशानि सर्वपापहरा भव ॥
अपराधसहस्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया ।
दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वरि ॥

पूजन समर्पण: – हातात पाणी घेऊन खालील मंत्र म्हणा
ॐ अनेन यथाशक्ति अर्चनेन श्री महालक्ष्मीः प्रसीदतुः ॥
(ताम्हणात पाणी सोडावे, नमस्कार करें)

उत्तर पूजा एवं विसर्जन: –
आता अक्षत हातात घ्या (गणेश आणि महालक्ष्मीच्या मूर्तीशिवाय इतर सर्व) पूज्य देवतांना अक्षता वाहून पुढील मंत्राने विसर्जन विधी करा.:-
यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय मामकीम्‌ ।
इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च ॥

(Laxmi Puja Samapti)

॥ हरी: ॐ ॥ ॥ हरी: ॐ ॥ ॥ हरी: ॐ ॥

अवश्य देखें: –
दिवाली के दिन गलतिसे भी यह 8 काम ना करें, लक्ष्मीजी नहीं रुकेगी | On Laxmi puja 8 Things you shouldn’t do

हे ही वाचा –

लक्ष्मी पूजन हिन्दी में (यथा विधी)

Laxmi Pujan Hindi

1 thought on “Diwali laxmi puja 2023 Vidhi in Marathi For miraculous Results | दिवाळी लक्ष्मी पूजन मराठीमध्ये (विधिवत)”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.