Site icon जागृति मंच

गुरुचरित्र अध्याय चौदावा आणि महत्व | Power of Gurucharitra Adhyay 14 in Marathi

गुरुचरित्र ही पोथी अत्यंत प्रभावशाली असून याच्या पारायणाने अनेकांना वेगळे-वेगळे आणि अद्भुत अनुभव आले आहेत. या अमृतसार पोथी मधील अध्याय 14 वा देखील प्रभावी आहे.  मी स्वत: गेले काही वर्षे सातत्याने हा अध्याय वाचत आहे आणि खूप सुंदर अनुभव येत आहेत.

Gurucharitra Adhyay 14

गेल्या काही वर्षात चौदावा अध्याय वाचनाचे वेगवेगळे अनुभव ऐकायला मिळाले. माझ्या मामेभावाची आर्थिक विवंचनेतून घालमेल चालू होती कारण व्यवसाय ठप्प झाला होता. पाच माणसाचे कुटुंब, मुलाच्या वाढत्या वयात शिक्षणाचा खर्च, काही मेळ बसंत न्हवता. त्यावेळी हा अध्याय वाचायला कोणी तरी सांगितले. काही दिवसांतच समोरुन काही कंपन्यांनी आपल्या प्रोडक्ट्सची डीलरशिप देऊ केली. विशेष म्हणजे त्याच्या सचोटीमुळे डीलरशिपसाठी लागणारे भरमसाठ डीपोझिट सुद्धा माफ केले. कोविडमध्ये देखील त्याचा व्यवसाय सुरळीत चालू होता.

खाली अजून काही अनुभव मी देणार आहे. आपलेही काही अनुभव असतील तर कॉमेन्ट मध्ये जरुर लिहा जेणेकरुन गुरुभक्तांना प्रेरणा मिळेल.

॥ गुरुचरित्र अध्याय चौदावा ॥ Gurucharitra Adhyay 14 in Marathi

श्री गणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः ।

नामधारक शिष्य देखा । विनवी सिद्धासी कवतुका ।
प्रश्न करी अतिविशेखा । एकचित्ते परियेसा ॥ १ ॥
 
जय जया योगीश्वरा । सिद्धमूर्ति ज्ञानसागरा ।
पुढील चरित्र विस्तारा । ज्ञान होय आम्हांसी ॥ २ ॥
 
उदरव्यथेच्या ब्राह्मणासी । प्रसन्न जाहले कृपेसी ।
पुढे कथा वर्तली कैसी । विस्तारावे आम्हांप्रति ॥ ३ ॥
 
ऐकोनि शिष्याचे वचन । संतोष करी सिद्ध आपण ।
गुरुचरित्र कामधेनु जाण । सांगता जाहला विस्तारे ॥ ४ ॥
 
ऐक शिष्या शिखामणि । भिक्षा केली ज्याचे भुवनी ।
तयावरी संतोषोनि । प्रसन्न जाहले परियेसा ॥ ५ ॥
 
गुरुभक्तीचा प्रकारु । पूर्ण जाणे तो द्विजवरू ।
पूजा केली विचित्रु । म्हणोनि आनंद परियेसा ॥ ६ ॥
 
तया सायंदेव द्विजासी । श्रीगुरू बोलती संतोषी ।
भक्त हो रे वंशोवंशी । माझी प्रीति तुजवरी ॥ ७ ॥
 
ऐकोनि श्रीगुरुचे वचन । सायंदेव विप्र करी नमन ।
माथा ठेवून चरणी । न्यासिता झाला पुनःपुन्हा ॥ ८ ॥
 
जय जया जगद्गुरू । त्रयमूर्तींचा अवतारू ।
अविद्यामाया दिससी नरु । वेदां अगोचर तुझी महिमा ॥ ९ ॥
 
विश्वव्यापक तूंचि होसी । ब्रह्मा-विष्णु-व्योमकेशी ।
धरिला वेष तूं मानुषी । भक्तजन तारावया ॥ १० ॥
 
तुझी महिमा वर्णावयासी । शक्ति कैंची आम्हांसी ।
मागेन एक आता तुम्हांसी । तें कृपा करणे गुरुमूर्ति ॥ ११ ॥
 
माझे वंशपारंपरी । भक्ति द्यावी निर्धारी ।
इहे सौख्य पुत्रपौत्री । उपरी द्यावी सद्गति ॥ १२ ॥
 
ऐसी विनंति करुनी । पुनरपि विनवी करुणावचनी ।
सेवा करितो द्वारयवनी । महाशूरक्रुर असे ॥ १३ ॥
 
प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी । घात करितो जीवेसी ।
याचि कारणे आम्हांसी । बोलावीतसे मज आजि ॥ १४ ॥
 
जातां तया जवळी आपण । निश्चये घेईल माझा प्राण ।
भेटी जाहली तुमचे चरण । मरण कैचे आपणासी ॥ १५ ॥
 
संतोषोनि श्रीगुरूमूर्ति । अभयंकर आपुले हाती ।
विप्रमस्तकी ठेविती । चिंता न करी म्हणोनिया ॥ १६ ॥
 
भय सांडूनि तुवां जावे । क्रुर यवना भेटावे ।
संतोषोनि प्रियभावे । पुनरपि पाठवील आम्हांपाशी ॥ १७ ॥
 
जंववरी तू परतोनि येसी । असो आम्ही भरंवसी ।
तुवां आलिया संतोषी । जाऊ आम्हीं येथोनि ॥ १८ ॥
 
निजभक्त आमुचा तू होसी । पारंपर-वंशोवंशी ।
अखिलाभीष्ट तू पावसी । वाढेल संतति तुझी बहुत ॥ १९ ॥
 
तुझे वंशपारंपरी । सुखे नांदती पुत्रपौत्री ।
अखंड लक्ष्मी तयां घरी । निरोगी होती शतायुषी ॥ २० ॥
 
ऐसा वर लाधोन । निघे सायंदेव ब्राह्मण ।
जेथे होता तो यवन । गेला त्वरित तयाजवळी ॥ २१ ॥
 
कालांतक यम जैसा । यवन दुष्ट परियेसा ।
ब्राह्मणाते पाहतां कैसा । ज्वालारूप होता जाहला ॥ २२ ॥
 
विमुख होऊनि गृहांत । गेला यवन कोपत ।
विप्र जाहला भयचकित । मनीं श्रीगुरूसी ध्यातसे ॥ २३ ॥
 
कोप आलिया ओळंबयासी । केवी स्पर्शे अग्नीसी ।
श्रीगुरूकृपा होय ज्यासी । काय करील क्रुर दुष्ट ॥ २४ ॥
 
गरुडाचिया पिलीयांसी । सर्प तो कवणेपरी ग्रासी ।
तैसे तया ब्राह्मणासी । असे कृपा श्रीगुरुची ॥ २५ ॥
 
कां एखादे सिंहासी । ऐरावत केवीं ग्रासी ।
श्रीगुरुकृपा होय ज्यासी । कलिकाळाचे भय नाही ॥ २६ ॥
 
ज्याचे हृदयीं श्रीगुरुस्मरण । त्यासी कैंचे भय दारुण ।
काळमृत्यु न बाधे जाण । अपमृत्यु काय करी ॥ २७ ॥
 
ज्यासि नांही मृत्यूचे भय । त्यासी यवन असे तो काय ।
श्रीगुरुकृपा ज्यासी होय । यमाचे मुख्य भय नाही ॥ २८ ॥
 
ऐसेपरी तो यवन । अन्तःपुरांत जाऊन ।
सुषुप्ति केली भ्रमित होऊन । शरीरस्मरण त्यासी नाही ॥ २९ ॥
 
हृदयज्वाळा होय त्यासी । जागृत होवोनि परियेसी ।
प्राणांतक व्यथेसी । कष्टतसे तये वेळी ॥ ३० ॥
 
स्मरण असे नसे कांही । म्हणे शस्त्रे मारितो घाई ।
छेदन करितो अवेव पाही । विप्र एक आपणासी ॥ ३१ ॥
 
स्मरण जाहले तये वेळी । धांवत गेला ब्राह्मणाजवळी ।
लोळतसे चरणकमळी । म्हणे स्वामी तूंचि माझा ॥ ३२ ॥
 
येथे पाचारिले कवणी । जावे त्वरित परतोनि ।
वस्त्रे भूषणे देवोनि । निरोप दे तो तये वेळी ॥ ३३ ॥
 
संतोषोनि द्विजवर । आला ग्रामा वेगवत्र ।
गंगातीरी असे वासर । श्रीगुरुचे चरणदर्शना ॥ ३४ ॥
 
देखोनिया श्रीगुरूसी । नमन करी तो भावेसी ।
स्तोत्र करी बहुवसी । सांगे वृत्तांत आद्यंत ॥ ३५ ॥
 
संतोषोनि श्रीगुरूमूर्ति । तया द्विजा आश्वासिती ।
दक्षिण देशा जाऊ म्हणती । स्थान-स्थान तीर्थयात्रे ॥ ३६ ॥
 
ऐकोनि श्रीगुरुंचे वचन । विनवीतसे कर जोडून ।
न विसंबे आतां तुमचे चरण । आपण येईन समागमे ॥ ३७ ॥
 
तुमचे चरणाविणे देखा । राहो न शके क्षण एका ।
संसारसागर तारका । तूंचि देखा कृपासिंधु ॥ ३८ ॥
 
उद्धरावया सगरांसी । गंगा आणिली भूमीसी ।
तैसे स्वामी आम्हासी । दर्शन दिधले आपुले ॥ ३९ ॥
 
भक्तवत्सल तुझी ख्याति । आम्हा सोडणे काय नीति ।
सवे येऊ निश्चिती । म्हणोनि चरणी लागला ॥ ४० ॥
 
येणेपरी श्रीगुरूसी । विनवी विप्र भावेसी ।
संतोषोनि विनयेसी । श्रीगुरू म्हणती तये वेळी ॥ ४१ ॥
 
कारण असे आम्हा जाणे । तीर्थे असती दक्षिणे ।
पुनरपि तुम्हां दर्शन देणे । संवत्सरी पंचदशी ॥ ४२ ॥
 
आम्ही तुमचे गांवासमीपत । वास करू हे निश्चित ।
कलत्र पुत्र इष्ट भ्रात । मिळोनी भेटा तुम्ही आम्हां ॥ ४३ ॥
 
न करा चिंता असाल सुखे । सकळ अरिष्टे गेली दुःखे ।
म्हणोनि हस्त ठेविती मस्तके । भाक देती तये वेळी ॥ ४४ ॥
 
ऐसेपरी संतोषोनि । श्रीगुरू निघाले तेथोनि ।
जेथे असे आरोग्यभवानी । वैजनाथ महाक्षेत्र ॥ ४५ ॥
 
समस्त शिष्यांसमवेत । श्रीगुरु आले तीर्थे पहात ।
प्रख्यात असे वैजनाथ । तेथे राहिले गुप्तरूपे ॥ ४६ ॥
 
नामधारक विनवी सिद्धासी । काय कारण गुप्त व्हावयासी ।
होते शिष्य बहुवसी । त्यांसी कोठे ठेविले ॥ ४७ ॥
 
गंगाधराचा नंदनु । सांगे गुरुचरित्र कामधेनु ।
सिद्धमुनि विस्तारून । सांगे नामकरणीस ॥ ४८ ॥
 
पुढील कथेचा विस्तारू । सांगता विचित्र अपारु ।
मन करूनि एकाग्रु । ऐका श्रोते सकळिक हो ॥ ४९ ॥

इति श्रीगुरूचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे क्रुरयवनशासनं-सायंदेववरप्रदानं नाम चतुर्दशोSध्यायः ॥ 

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ 

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

Gurucharitra Adhyay 14 Benefits | गुरुचरित्र १४ वा अध्याय अर्थ |

गुरुचरित्र ही पोथी अत्यंत प्रभावशाली असून याच्या पारायणाने अनेकांना वेगळे-वेगळे आणि अद्भुत अनुभव आले आहेत. या अमृतसार पोथी मधील अध्याय 14 वा देखील प्रभावी आहे. 

आपण जेव्हा अर्थ समजून पोथी, मंत्र श्लोक किंवा अध्याय वाचतो तेव्हा त्यांची फलप्राप्ती अजून लवकर होऊ शकते.

या अध्याया मध्ये कथन केले आहे की गुरु नृसिंह सरस्वती यांनी त्यांचे शिष्य सायंदेव यांना भयानक स्थितीतून कशी सुटका केली. सायंदेवाला एकदा राजाने बोलावले होते. यवन राजा खूप क्रूर होता. जेव्हा जेव्हा राजा कोणत्याही व्यक्तीला बोलावणे धाडतो  तेव्हा लोकांना माहित होते की त्या व्यक्तीचे प्रत्यक्ष मरणच ओढवले आहे.

तसा सायंदेव त्याच्या मृत्यूला भेटायला जाणार होता. म्हणून त्याने आपले गुरु नृसिंह सरस्वती यांच्या दर्शानाला गेला आणि त्यांना विनवणी केली की त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद द्या आणि त्याच्या मृत्यूनंतरही त्यांच्या कुटुंबामध्ये वंशपरंपरागत  गुरुभक्ती कायम राहुदे. त्याने गुरूला असेही सांगितले की तो (सायंदेव) त्याच्या मृत्यूला भेटणार आहे कारण त्याला राजाने बोलावले आहे. 

गुरु नृसिंह सरस्वतींनी त्याला आश्वस्थ केले की राजा त्याला मारणार नाही. उलट राजा त्याचा सन्मान करेल आणि त्याला अनेक भेटवस्तू देईल. पुढे त्यांनी त्याला आश्वासन दिले की तो (सायंदेव) राजाची भेट घेऊन परत येईपर्यंत ते स्वतः (गुरु नृसिंह सरस्वती) तिथे थांबतील. 

सायंदेव जेथे त्याला राजाने बोलावले होते तेथे राजवाड्यात गेला. राजा खूप चिडलेला होता. तो सायंदेवाला मारण्यासाठी त्याचे शस्त्र आणण्यासाठी आत गेला. 

पण इकडे खोलीत गेल्यानंतर राजा झोपी गेला आणि त्याला स्वप्न पडले आणि दहभान विसरला. त्या राजाला हृदय शूळ उठला, तसा तो जागृत होऊनि, प्राणांतक यातना होत असता त्याला वाटले की कोणी एक विप्र त्याला मारित आहे. तसा तो उठला आणि सायंदेवाकडे आला आणि त्याला क्षमा याचना करु लागला. त्या राजाने सायंदेवाला पैसे, कपडे आणि अनेक मौल्यवान वस्तू दिल्या. 

स्वामी नृसिंह सरस्वती यांनी सायंदेवाला सांगितल्याप्रमाणे सर्व काही घडले. कितीही भयानक संकटे, अडचणी आल्या असतील आणि त्यातून मार्ग काढायचा असेल तर हा  १४ वा अध्याय नियमित वाचावा.

एखाद्या गुरुवारी सकाळी स्नान करुन देवा समोर बसून संकल्प सोडावा आणि या १४ व्या अध्यायाचे मनोभावे पठन करावे. 

माझा स्वतःचा अनुभव खूप बोलका आहे. आपणही याचा लाभ करुन घ्यावा आणि इतरांनाही सांगावे.

लेखक तुम्हाला स्वानुभवाने प्रेरित करीत आहेत पण तसा दावा करीत नाही, कारण हा प्रत्येक व्यक्तीच्या भक्ती आणि विश्वासाचा परिणाम असतो. जर एखादा चॅनल ट्यून केला नाही तर जसा रेडिओ किंवा टीव्हीच्या कार्यक्रमाचा आनंद लुटता येत नाही तसेच गुरूच्या चॅनल बरोबर ट्यून होऊन म्हणजेच भक्तीभावाने केले तर यांचे फलित प्राप्त लवकर होऊ शकते.

गुरुचरित्र 14 वा अध्याय महत्व हिन्दी में: –

गुरुचरित्र एक बहुत ही प्रभावशाली ग्रंथ है और इसके पारायण ने कई अलग और अद्भुत अनुभव दिए हैं। इस अमृतसर पोथी का अध्याय 14 भी प्रभावी है।

यह अध्याय बताता है कि कैसे गुरु नृसिंह सरस्वती ने अपने शिष्य सायंदेव को एक भयानक स्थिति से बचाया। सायन्देव को एक बार राजा ने बुलाया था। यूनानी राजा बहुत क्रूर था। जब भी राजा ने किसी व्यक्ति को बुलावा भेजा, तो लोगों को पता चल जाता था कि उस व्यक्ति की वास्तविक मृत्यु निकट है।

ऐसे में सायंदेव अपनी मृत्यु को मिलने जा रहे थे। इसलिए वे अपने गुरु नृसिंह सरस्वती के पास गए और उनसे अपने परिवार को आशीर्वाद देने और उसकी मृत्यु के बाद भी अपने परिवार में गुरु के भक्ती को बनाए रखने की भीख मांगी। उसने गुरु से यह भी कहा कि वह (सायंदेव) उसकी मृत्यु से मिलने जा रहा है क्योंकि उसे राजा ने बुलाया था।

गुरु नृसिंह सरस्वती ने उन्हें आश्वासन दिया कि राजा उन्हें नहीं मारेंगे। इसके बजाय, राजा उसका सम्मान करेगा और उसे बहुत से उपहार देगा। बाद में उन्होंने उसे आश्वासन दिया कि वह (गुरु नृसिंह सरस्वती) तब तक वहीं रहेंगे जब तक कि वह (सायंदेव) राजा से मिलने के बाद वापस नहीं आ जाता।

सायन्देव उस महल में गया जहाँ राजा ने उसे बुलाया था। राजा बहुत क्रोधित हुआ। वह सायंदेव को मारने के लिए अपना हथियार लाने के लिए अंदर गया।

लेकिन कमरे में प्रवेश करते ही राजा सो गया और एक सपना देखा और देहभान को भूल गया। राजा को जैसे दिल का दौरा पड़ा और जैसे ही उसे बहुत दर्द हो रहा था, उसने सोचा कि कोई उसे मार रहा है। तो वह उठा और सायंदेव के पास आया और उससे क्षमा याचना करने लगा। राजा ने सायन्देवा को धन, वस्त्र और बहुतसी अन्य मूल्यवान वस्तुएँ दीं।

सब कुछ वैसा ही हुआ जैसा स्वामी नृसिंह सरस्वती ने सायंदेव को बताया। कितनी भी भयानक विपत्तियाँ, कठिनाइयाँ क्यों न आएँ और यदि आप इससे निकलने का रास्ता खोजना चाहते हैं, तो आपको इस 14वें अध्याय को नियमित रूप से पढ़ना चाहिए।

किसी भी गुरुवार की सुबह स्नान करके भगवान के सामने बैठना चाहिए और संकल्प करते हुए और इस 14 वें अध्याय का रोजाना पाठ करना चाहिए।

मेरा अपना अनुभव बहुत ही सुंदर है। हमें इसका लाभ उठाना चाहिए और इसे दूसरों के साथ साझा करना चाहिए।

॥ हरी: ॐ ॥

                                                                || शुभं भवतु ||

हे ही वाचा: –

यूट्यूब चॅनल पहा: –

Exit mobile version