श्री दुर्गा देवीची आरती | Durga Devi Arati
Durga Devi Arati is a famous arati sung in all Marathi families also during the Ganesh Festival. It’s being a tradition to sing 5 or 11 Aaratis during any pooja performance in family or public.
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी । अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी । वारी वारी जन्ममरणाते वारी । हारी पडलो आता संकट निवारी ॥ १ ॥
जय देवी जय देवी महिषासुरमथनी । सुरवरईश्वर-वरदे तारक संजीवनी ॥ जय देवी जय देवी ॥ धृ० ॥
त्रिभुवनभुवनी पहाता तुजऐसी नाही । चारी श्रमले परंतु न बोलवे काही । साही विवाद करिता पडले प्रवाही । ते तू भक्तालागी पावसी लवलाही ॥ २ ॥
जय देवी जय देवी महिषासुरमथनी । सुरवरईश्वर-वरदे तारक संजीवनी ॥ जय देवी जय देवी ॥ धृ० ॥
प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासां । क्लेशांपासुनी सोडवी तोडी भवपाशा । अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा । नरहरि तल्लीन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥
जय देवी जय देवी महिषासुरमथनी । सुरवरईश्वर-वरदे तारक संजीवनी ॥ जय देवी जय देवी ॥ धृ० ॥